कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय, ‘हा’ काढा नक्की प्या…

| Updated on: May 02, 2021 | 2:31 PM

कोरोना टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीच्या काढा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचीय, हा काढा नक्की प्या...
काढा
Follow us on

मुंबई : कोरोना टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीच्या काढा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज सकाळी चहा पिण्यापेक्षा हा तुळशीचा काढा पिल्ला पाहिजे. हा तुळशीचा काढा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Basil extract is beneficial for boosting the immune system)

विशेष म्हणजे हा काढा आपण कमी वेळेत आणि घरीच तयार करू शकतो. तुळशीच्या पानांमध्ये अ, क आणि के जीवनसत्त्वे असतात. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम सारख्या खनिजे असतात. तुळशीच्या पानांमध्येही प्रथिने आणि फायबरची मात्रा चांगली असते.

तुळशीचा काढा

1. सहा ते सात तुळशीची पाने

2. दोन-तीन मिरपूड

3. अर्धा चमचा काळी मिरची

4. दोन ते तीन लवंगा

5. अर्धा आल्याचा तुकडा

6. पाणी

7. मीठ

काढा तयार करण्याची पध्दत

तुळशीचा काढा तयार करण्यासाठी एक वाटी पाणी उकळण्यासाठी पॅनमध्ये ठेवा. यानंतर त्यात सर्व साहित्य घाला. त्यात लवंगा, मिरपूड, एक चिमूटभर मीठ, आले आणि तुळस घाला. अर्ध्या तासापर्यंत पाणी उकळून घ्या. थोडा काढा थंड झाला की, गाळून घ्या आणि प्या. हा काढा दररोज सकाळी आपण चहाऐवजी प्या.यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

तुळशीचा काढा पिण्याचे फायदे

1. तुळशीचा काढा पिल्याने शरीरातील विषारी द्रव्य सहजपणे बाहेर पडतात.

2. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. ते आपल्याला सर्दी आणि खोकल्यापासून वाचविण्यात मदत करतात.

3. तुळसमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. संसर्ग टाळण्यासाठी फुफ्फुसांना मदत करतात.

4. तुळशीमध्ये अँटिप्रेसस गुणधर्म आहेत. ते आपल्याला तणावमुक्त करतात. ते शरीरात कार्टिझोल पातळी संतुलित करतात.

5. तुळशीत एंटी-डिप्रेससन्ट गुणधर्म आहेत. यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात.

तुळश खाण्याचे दुष्परिणाम

1. तुळशीच्या पानात उष्णता अधिक असते. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते.

2. गरोदरपणात तुळशीचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून तुळशीचे काळजीपूर्वक सेवन करा.

3. तुळसमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब पातळी कमी होऊ शकते.

4. तुळशीचे जास्त सेवन केल्याने रक्त पातळ होऊ शकते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

5. शस्त्रक्रियेदरम्यान किंवा शस्त्रक्रियेनंतर जास्त तुळस सेवन करणे हानिकारक आहे. यामुळे रक्त जमण्याची प्रक्रिया कमी होऊ शकते.

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

(Basil extract is beneficial for boosting the immune system)