मुंबई : ‘व्हॅलेंटाईन डे’चा (Valentines Day) संपूर्ण आठवडा विविध ‘डेज्’ने आपण साजरा करीत असतो. या आठवड्यात प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते. त्यानुसार आपण तो साजरा करीत असतो. विवाहित जोडपी एकमेकांसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’चा आनंद घेतात. तर अनेक वर्षांपासून ‘रिलेशनशिप’मध्ये असलेले अविवाहितदेखील तितक्याच उत्साहात हा दिवस साजरा करतात. परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वीच नवे नाते सुरु केलेल्या ‘कपल्स्’नी (Couples)‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपला जोडीदार आपली फसवणूक (Cheating) तर करत नाहीय ना, याची पडताळणी करणे आवश्यक असते. यामुळे फसवणुकीला बळी न पडतात. यातून फसवणूक कशी होते आणि तुम्ही ते कसे टाळू शकता ते जाणून घेणार आहोत. या टिप्सचा वापर करा आणि धोका टाळा.
1) जर तुम्ही कोणत्याही ‘डेटिंग अॅप’वर तुमचा जोडीदार शोधत असाल तर हे करण्याआधी सावधता बाळगावी. काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही अशी फसवणूक टाळू शकता. तुम्ही कोणत्याही ‘अॅप’वर सहज विश्वास ठेवू नका. कोणतेही अॅप ‘डाऊनलोड’ करण्यापूर्वी त्याच्याबद्दलच्या लोकांच्या प्रतिक्रिया नक्की जाणून घ्याव्यात.
2) ‘अॅप्स’वर आपली प्रोफाइल तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यात चुकूनही तुमची सर्व माहिती भरू नका. तसेच, अॅपवर नोंदणी करताना तुमच्या नेहमीच्या मोबाइल क्रमांकाऐवजी वापरात नसलेला क्रमांक टाकण्याचा प्रयत्न करा. तुमचा ईमेल आयडी देणे टाळा आणि तुमचे सोशल मीडिया प्रोफाइलचीही माहिती त्यावर देउ नका.
3) कुठलेही ‘अॅप’ वापरताना समोरची व्यक्ती किंवा ते ‘अॅप’आपल्या पूर्णत: अनोळखी असते. त्यामुळे त्यावर काहीही करताना सावधता बाळगा, तसेच त्यावर पैशांचा व्यवहार चुकूनही करुन नका. त्यावर कोणी तुमच्याकडे पैसे मागितले तर कधीही पैसे देउ नका.
4) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आठवड्यात अनेक जण आपला जोडीदार शोधण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी विविध‘अॅप्स’चा वापर केला जात असतो. त्या माध्यमातून आपली आपल्या जोडीदाराशी ओळखही होते. परंतु अशी ओळख करताना समोरच्या व्यक्तीची पूर्ण माहिती जाणून घ्या, अशा लोकांसोबत डेटींगला जाताना विशेष काळजी घ्या, निर्जन ठिकाणी जाउ नका, त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारे फोटो काढू नका.
संबंधित बातम्या