थंडीच्या दिवसात त्वचेवरील ओलावा टिकून राहण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

| Updated on: Nov 30, 2024 | 2:48 PM

हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने त्वचा कोरडी पडणे खूप सामान्य आहे, परंतु यामुळे चेहऱ्यावर मुरुम येणे आणि खाज सुटणे यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता. हे तुमच्या त्वचाला हायड्रेटेड आणि मऊ ठेवण्यास मदत करू शकते.

थंडीच्या दिवसात त्वचेवरील ओलावा टिकून राहण्यासाठी करा हे सोपे उपाय
Follow us on

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे त्वचा कोरडी पडणे खूप सामान्य आहे. कारण थंडीच्या दिवसात वातावरणातील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे त्वचेची देखील आर्द्रता कमी होतेव त्वचा कोरडी पडते. घरात किंवा ऑफिसमध्ये हीटिंग सिस्टीम वापरल्याने हवा कोरडी होते, ज्यामुळे त्वचा आणखी कोरडी होऊ शकते. हिवाळ्यात अनेक लोकं जास्त गरम पाण्याने आंघोळ करतात, ज्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी होऊ शकते. थंडीच्या दिवसात अश्या अनेक कारणाने तुमची त्वचा पडते.

अनेकदा कोरड्या त्वचेमुळे खाज सुटणे आणि जळजळ होणे, लहान पिंपल्स येणे, तसेच चेहरा निस्तेज दिसणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या ऋतूत त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

मॉयश्चरायझरचा वापर

हिवाळ्यात त्वचेला हायड्रेट आणि मॉयश्चराइझ करण्यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे त्वचा मऊ राहण्यास आणि तुमच्या त्वचेवरील कोरडेपणा टाळण्यास मदत होते. तसेच दिवसभरात चेहरा धुतल्यानंतर दिवसातून दोनदा मॉयश्चरायझर लावावे. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर त्यानुसार मॉयश्चरायझरची निवड करावी.

जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका

हिवाळ्यात बरेच लोक खूप गरम पाण्याने आंघोळ करतात, परंतु यामुळे तुमच्या त्वचा कोरडी होण्याबरोबरच त्वचेचे बरेच नुकसान देखील होऊ शकते. त्वचे संबंधित अनेक समस्या निर्माण होतील. त्यामुळे आंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा.

नैसर्गिक तेलाचा वापर

जर तुमची त्वचा मुळातच कोरडी असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी घरगुती उपायदेखील अवलंबू शकता जसे की तुम्ही नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल यासारखे नैसर्गिक तेल त्वचेवर लावू शकता. हे तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करण्यास आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करते.

हायड्रेटेड रहा

हायड्रेटेड राहणे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. त्वचेला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे प्रमाणात पाणी प्या. हिवाळ्यात थंड वातावरण असल्याने तहान लागत नाही ज्यामुळे लोक कमी पाणी पितात, अश्याने त्वचा कोरडी पडू शकते. म्हणून थंडीच्या दिवस तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता आणि खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ शकता. जेणेकरून कोणत्याच समस्या निर्माण होणार नाही.