फक्त जेवणातच नव्हे तर सौंदर्यासाठी गुणकारी आहे कढीपत्ता, जाणून घ्या फायदे…

| Updated on: Nov 15, 2024 | 4:44 PM

 स्वयंपाक करताना चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आपण कढीपत्त्याचा वापर करतो. पण चव वाढवण्यासोबतच त्वचेलाही कढीपत्त्याचा खूप फायदा होतो.

फक्त जेवणातच नव्हे तर सौंदर्यासाठी गुणकारी आहे कढीपत्ता, जाणून घ्या फायदे...
Follow us on

हिवाळ्यात त्वचा थोडी कोरडी होऊ लागते. त्यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. अशा परिस्थितीत चेहरा चमकदार करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे सौंदर्य उत्पादने आणि घरगुती उपायांचा अवलंब करतात. यामध्ये कढीपत्त्याचाही समावेश होतो. कढीपत्ता आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पौष्टिक घटक त्वचेला चमक आणण्यास मदत करतात.

कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, बी आणि सी तसेच अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग कमी करुन चेहरा चमकदार बनविण्यास मदत होते. यासाठी तुम्ही अनेक नैसर्गिक घटकांमध्ये कढीपत्ता मिसळून फेसपॅक बनवू शकता. चेहऱ्यावर लावू शकता.

कढीपत्ता आणि हळद

तुम्ही कढीपत्ता आणि हळद यांचा फेसपॅक देखील लावू शकता. यासाठी सर्वप्रथम दहा ते बारा पाने घ्या. ती बारीक करून पेस्ट बनवा. त्यात चिमूटभर हळद आणि एक ते दोन चमचे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा फेस पॅक त्वचा स्वच्छ करण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतो. हळदीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेला आराम वाटण्यास मदत होते.

कढीपत्त्याचे तेल

दहा ते पंधरा कढीपत्ता घ्या आणि पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर खोबरेल तेलात कढीपत्ता टाका आणि मंद आचेवर काही मिनिटे उकळून घ्या. या नंतर ते थंड होऊन ते गाळून एका बाटलीत भरून ठेवा. आता हे तेल चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून मसाज करा. यामुळे चेहऱ्याला आर्द्रता आणि पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा मुलायम राहते.

कढीपत्ता आणि मुलतानी माती

कढीपत्ता बारीक करून पावडर तयार करा. आता त्यामध्ये गुलाबजल आणि मुलतानी माती मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटे लावल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. ह्या पेस्टमुळे चेहऱ्यावर चमक येवून डाग नाहीसे होण्यास मदत होईल. त्यासोबतच या पेस्टमुळे त्वचा नितळ होते.