मुंबई : चेहरा सुंदर आणि तजेलदार ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील त्वचा सुंदर होण्यास मदत होते. आपला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा तरी चेहरा धुतला पाहिजे. आठवड्यातून किमान दोनदा स्क्रब करा आणि फेस स्टीम घ्या. सकाळी आणि रात्री त्वचेत हायड्रेट होण्यासाठी बदाम तेल, नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने हलक्या हाताने मसाज करा किंवा मॉश्चरायझर करा.(Almond oil and coconut oil are beneficial for the skin)
बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. हळूहळू, आपला रंग देखील उजळेल आणि त्वचा चमकू लागेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं. खोबरले तेल शरीरासाठी फायदेशीर ठरतं.
खोबरेल तेल त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम आणि चांगली होते. तुमचे जर ओठ सतत उलत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा. चेहऱ्यावर मुरूम येत असले तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.
तसंच काळपटपणा दूर करायचा असेल तर खोबरेल तेल थेट लावण्यापेक्षा त्यात अक्रोडची पावडर मिक्स करावी आणि त्वचेवर लावा साधारण 25 ते 30 मिनिटे लावून ठेवा असे आठवड्यातून तीन वेळा करा यामुळे काळपटपणा निघून जाईल. दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे काळपट त्वचेवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करावं. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच ठेवून नंतर धुवून टाकावी.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Almond oil and coconut oil are beneficial for the skin)