मुंबई : बदाम खाणे आपल्या त्वचा, केस आणि आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर आहे. बदामाच्या मदतीने आपण त्वचेच्या असंख्य समस्या दूर करू शकतो. बदामाचे काही फेसपॅक लावले तर लगेचच ग्लो आपल्या त्वचेवर येतो. मात्र, अनेक लोक बदाम (Almond) खाताना एक प्रमुख चुक करतात. ज्यामुळे म्हणावे तसे फायदे बदामामधून मिळत नाहीत. अनेक वेळा बदाम हे कच्चे खाल्ले जाते. यामुळे शरीराला हवे तेवढे पोषण तत्वे अजिबात बदाममधून मिळत नाहीत. जर आपल्याला बदामामधील सर्वच पोषण तत्वे (Nutrients) मिळवायची असतील तर आपण नेहमीच बदाम हे रात्री पाण्यात भिजत ठेवून सकाळी त्याचे रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये सेवन करावे. मात्र, हे लक्षात ठेवा की, बदामाची साल काढून खा, थेट कधीही बदाम खाऊ नका. पण बदामाची सालही फेकून देऊ नका. बदामाची साल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
बदामाच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. हे फार कमी लोकांना माहीत असेल, बदामाच्या सालींचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेच्या निगा राखण्यासाठीही वापरले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, बदामाच्या सालीला त्वचेच्या काळजीचा भाग बनवून तुम्ही त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर करू शकता.
तुम्ही बदामाच्या सालीने त्वचा एक्सफोलिएट करू शकता. यासाठी 12 बदामाची साले घेऊन तीन चमचे दुधात मिसळा. त्यात पाणी देखील घाला. तयार पेस्ट एका भांड्यात काढा आणि नंतर चेहऱ्यावर आणि हातांवर हलके मसाज करा, तुम्हाला हवे असल्यास हे मिश्रण बॉडी स्क्रब म्हणून वापरा. या खास फेसपॅकमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
बदामाच्या सालीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. याचे सेवन केल्याने आतड्यात चांगले बॅक्टेरिया तयार होतात. त्यात व्हिटॅमिन ई सह आढळणारे फ्लेव्होनॉइड्स कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, जरी तुम्ही ते त्वचेच्या काळजीमध्ये देखील वापरू शकता.