मुंबई : उन्हाळ्यात त्वचेची काळजी (Care) घेण्यासाठी आपण महागडी उत्पादने वापरतो. कारण या हंगामामध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. मात्र, कितीही महागडी उत्पादने वापरली तरीही त्वचेच्या समस्या काही कमी होत नाहीत. यासाठी त्वचेच्या सर्व समस्या या हंगामामध्ये दूर करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies) अत्यंत फायदेशीर ठरतात. या घरगुती उपायांचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेला लवकर इजा करत नाहीत. विशेष म्हणजे आपल्या त्वचेसाठी कोरफड आणि भाताचे पाणी खूप जास्त फायदेशीर (Beneficial) असते. कोरफड आणि भाताच्या पाण्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात कोरफड आणि भाताच्या पाण्याचे फायदे.
भाताचे पाणी नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते. ते अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करते. याशिवाय भाताच्या पाण्याचा वापर सनबर्नवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. एका भांड्यात तांदळाचे पाणी घ्या आणि त्यात एक चमचा कोरफडीचे जेल टाका, नीट मिक्स केल्यानंतर काही वेळ राहू द्या, चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते धुण्यास विसरू नका. असे केल्याने चेहऱ्यावरील घाण चेहऱ्याच्या आत जाणार नाही. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी राहू द्या. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेवर येणारा घाम यामुळे चिडचिडेपणासोबतच खाज येऊ शकते. अशा परिस्थितीत त्वचेला आराम देण्यासाठी तांदळाचे पाणी आणि कोरफडीचे जेल फायदेशीर ठरते. यासाठी भाताचे ताजे पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कोरफड जेल मिक्स करा. ही पेस्ट आता आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे त्वचेवरील टॅन जाण्यास मदत होते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)