मुंबई : कोरफड त्वचा, केस (Hair) आणि आरोग्य सर्वांसाठीच फायदेशीर आहे. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये कोरफडचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात थंड आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. उन्हाळ्यात (Summer) त्वचेसाठी तुम्ही याचा अनेक प्रकारे वापर करू शकता. त्वचेशी संबंधित अनेक समस्या मुरुम, डाग आणि टॅन दूर करण्यास कोरफड मदत करते. तुम्ही घरच्या घरी कोरफडीच्या (Aloevera) पानांचे ताजे जेल काढून त्याचा वापर करू शकता. चला जाणून घेऊया याचा त्वचेसाठी कसा वापर केला जाऊ शकतो आणि ते त्वचेसाठी किती फायदेशीर आहे.
त्वचेसाठी एक्सफोलिएशन खूप महत्वाचे आहे. अशावेळी तुम्ही कोरफडीचा वापर बॉडी स्क्रब म्हणून करू शकता. त्यात सॅलिसिलिक अॅसिड असते. ते मृत त्वचा दूर करण्यास मदत करते. 2 कप कोरफडीच्या जेलमध्ये ब्राऊन शुगर आणि ओटस मिक्स करा आणि त्वचेवर लावा. त्यानंतर काही वेळेने मसाज करा. 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा.
कोरफड जेलमध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेचा संसर्ग होत नाही. अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म देखील कोरफडमध्ये असतात. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आपण कोरफडमध्ये हळद टाकून दररोज चेहऱ्याला लावावे. यामुळे आपला चेहरा तजेलदार होतो.
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेवरील टॅन काढण्यासाठीही कोरफड खूप जास्त फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला तीन चमचे कोरफड आणि दोन चमचे दही लागणार आहे. दही आणि कोरफड मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या आणि थंड पाण्याने मसाज करत चेहरा धुवा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)