कोरफड त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी औषध, कसे ते जाणून घ्या!

| Updated on: Jul 13, 2021 | 9:58 AM

कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बहुगुणी असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो.

कोरफड त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी औषध, कसे ते जाणून घ्या!
कोरफड
Follow us on

मुंबई : कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बहुगुणी असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. (Aloe vera cures many skin problems)

1. चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी कोरफड अत्यंत फायदेशीर आहे. मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण कोरफडच्या गरमध्ये पपईचा गर मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते.

2. त्वचेवर पुरळ किंवा सूज येत असल्यास कोरफड जेल लावा. यामुळे खूप आराम मिळतो. शेव्हिंग किंवा वॅक्सिंगनंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी कोरफड जेल फायदेशीर आहे.

3. जर आपली त्वचा कोरडी पडत असेल तर आपण नारळ तेल आणि कोरफड मिक्स करून पेस्ट तयार करावी आणि चेहऱ्याला लावावी. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.

4. जर आपल्या टाचांना भेगा पडत असतील तर आपण रात्री झोपण्याच्या अगोदर कोरफड जेल टाचांना लावावे. यामुळे आपल्याला आराम मिळेल.

5. जर तुम्हाला बाजारपेठेतील महागडे टोनर वापरायच्या नाहीत तर गुलाब पाण्यात कोरफड जेल मिसळा आणि बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. हे टोनर म्हणून वापरा.

6. कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते. फुटलेल्या ओठांवर कोरफड जेल लावल्यास ओठ मुलायम होतात.

7. सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचे पान मध्यभागी कापून डोळ्यावर ठेवल्यास आराम वाटेल. डोळ्यांच्या भोवती कोरफड जेल लावल्यास काळीवर्तुळे नाहीशी होतात.

8. कोरफडीचा गर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कोरफडमध्ये व्हिटामिन आणि फायबर गुणधर्म असतात. दररोज कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!

(Aloe vera cures many skin problems)