Skin Care : तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ खास फेसपॅक चेहऱ्याला लावा!

| Updated on: Sep 13, 2021 | 5:34 PM

कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात कोरफडीचा खूप फायदा होतो. यामुळे बरेच लोक रस, भाजी किंवा इतर आणखी प्रकारे कोरफडचे सेवन करतात.

Skin Care : तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हा खास फेसपॅक चेहऱ्याला लावा!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात कोरफडीचा खूप फायदा होतो. यामुळे बरेच लोक रस, भाजी किंवा इतर आणखी प्रकारे कोरफडचे सेवन करतात. मात्र, आपण जर कोरफडचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला तर चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. (Aloe vera face pack is beneficial for oily skin problems)

तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी कोरफड अत्यंत फायदेशीर आहे. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर पुरळ येण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या चेहऱ्यावरील तेलाचा स्राव नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि काकडी वापरून फेसपॅक बनवू शकता. काकडी मॅश करून ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये मिसळा. काकडीमध्ये शीतलक गुणधर्म असतात. जे तेलकट त्वचेसाठी उत्तम आहेत. ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे सोडा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. कोरफडमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. फोरफडचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे ताजी कोरफड, हळद, मध आणि एक चमचा लिंबाचा रस लागणार आहे. सर्वात अगोदर कोरफडमध्ये हळद, मध आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि पेस्ट तयार करा, त्यानंतर पेस्ट काही वेळ फ्रीसमध्ये ठेवा आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

कोरड्या त्वचेची समस्या आणि चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण खास फेसपॅक तयार करून शकतो. यासाठी आपल्याला 4 चमचे कोरफडचा गर, 3 चमचे पपईचा गर आणि 4 चमचे गुलाब पाणी लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Aloe vera face pack is beneficial for oily skin problems)