स्क्रब करताना नेहमी हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा, अन्यथा ‘या’ परिणामांना सामोरे जावे लागेल!

| Updated on: Jul 11, 2021 | 5:07 PM

चेहरा स्क्रब करणे आपल्या चांगल्या त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र, बरेच लोक हलक्या हाताने स्क्रब न करता त्वचेवर जड हाताने आणि जोरात स्क्रब करतात.

स्क्रब करताना नेहमी हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा, अन्यथा या परिणामांना सामोरे जावे लागेल!
स्क्रब
Follow us on

मुंबई : चेहरा स्क्रब करणे आपल्या चांगल्या त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र, बरेच लोक हलक्या हाताने स्क्रब न करता त्वचेवर जड हाताने आणि जोरात स्क्रब करतात. यामुळे त्वचेच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे आपण नेहमीच स्क्रब अगदी हलक्या हाताने केले पाहिजे. (Always gently massage your face while scrubbing)

त्वचेवरील मृत त्वचेचा थर काढून टाकण्यासाठी हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करावा. हलक्या हातांनी नेहमी चेहरा घासा. जर, आपण हातांनी जास्त जोर दिल्यास चेहऱ्यावर पुरळ उठू शकते. तसेच जोर देऊन स्क्रब केल्याने आपल्या चेहऱ्याची त्वचा लालसर होण्याची शक्यता असते. चेहरा लालसर होऊन पिंपल्स देखील येण्याची शक्यता असते. यामुळे नेहमी स्क्रब हलक्या हातानेच करा.

मध आणि ब्राऊन शुगर स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचा कच्च्या मधामध्ये, एक चमचा ब्राऊन शुगर घाला. आता त्यात एक चमचा नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल घाला. दोन ते तीन थेंब सुगंधी तेल घाला आणि मिक्स करा. आता ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांसाठी मसाज करा. यानंतर ते 5 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा.

अक्रोड, आवळा, मध सर्वात अगोदर अक्रोड बारीक करून घ्या. मात्र खूप जास्त बारीक करू नका कारण स्क्रबसाठी ग्रॅन्यूल आवश्यक आहेत. एक चमचा मध घ्या आणि आवळा बारीक करून आता हे सर्व मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात हे मिश्रण घ्या आणि स्क्रब करा. कमीतकमी 5 मिनिटांसाठी आपला चेहरा स्क्रब करा आणि स्क्रबिंगनंतर 2 मिनिटांसाठी तसाच ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडा ठेवा.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या :

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या.. 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Always gently massage your face while scrubbing)