Skin Care : अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि गुलाब पाणी त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

| Updated on: Aug 05, 2021 | 2:41 PM

पावसाळ्यात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो, परंतु तरीही विशेष काही चांगला परिणाम मिळत नाही

Skin Care : अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि गुलाब पाणी त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
सुंदर चेहरा
Follow us on

मुंबई : पावसाळ्यात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो, परंतु तरीही विशेष काही चांगला परिणाम मिळत नाही. आपल्याला त्वचेच्या समस्या दूर करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत .ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. (Apple cider vinegar and rose water are beneficial for the skin)

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर त्वचेला लावून आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. तसेच गुलाब पाणी देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुलाब पाण्याच्या मदतीने आपण तजेलदार आणि सुंदर त्वचा मिळू शकतो. सुंदर त्वचेसाठी आपण अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि गुलाब पाणी आपल्या त्वचेसा लावले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.

लिंबू आणि मध हे नैसर्गिक ब्लीच मानले जाते, कारण त्यात नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात, जे चेहर्‍याचे रंग उजळ करण्यासाठी कार्य करतात. यामुळे आपण आपल्या चेहऱ्याला मध आणि लिंबू लावले पाहिजे. यासाठी आपण तीन चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे मध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.

ही पेस्ट वीस मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचा सुधारण्यास मदत करते. लिंबामुळे आपली त्वचा चमकदार होते. ते त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात. लिंबू तेलकट त्वचेसाठी चांगले आहे. हे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apple cider vinegar and rose water are beneficial for the skin)