मुंबई : प्रत्येक मुलीला लांब, जाड, चमकदार आणि निरोगी केस हवे असतात. कारण केसांचा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कडक सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि केमिकल आणि हीटिंग टूल्सचा वापर यामुळे केसांची चमक नाहीशी होते. केस लवकर तुटतात आणि कोरडे दिसतात.
जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर वापरावे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीसेप्टिक गुणधर्म केसांसाठी डॅमेज कंट्रोलचे काम करतात आणि कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून त्यांचे संरक्षण करतात. याच्या वापराने टाळू स्वच्छ राहते, कोंडा दूर होतो आणि केस चमकदार आणि निरोगी होतात. त्याचे फायदे जाणून घ्या.
केस गळणे प्रतिबंधित करते
जर तुमचे केस खूप वेगाने गळत असतील तर तुम्ही नेहमी अॅपल सायडर व्हिनेगर वापरावे. यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड केसांची पीएच पातळी संतुलित करते. केस गळणे आणि तुटणे थांबवते आणि कोंड्याची समस्या दूर करते.
टाळूतील घाण साफ करते
ज्याप्रमाणे शरीराला वेळोवेळी डिटॉक्सिफिकेशन करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे केसांना निरोगी ठेवण्यासाठी टाळूचे देखील डिटॉक्सिफिकेशन करणे आवश्यक आहे. यासाठी अॅपल व्हिनेगर हा सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म केसांची घाण साफ करतात. बुरशीजन्य संक्रमणास प्रतिबंध करते आणि केसांचे आरोग्य सुधारते.
केसांना चमक आणते
जर तुमच्या केसांची चमक नाहीशी झाली असेल तर हे व्हिनेगर खूप उपयुक्त आहे. यातील पोषक घटक केसांना मऊ करतात आणि तेलकट होण्यापासून रोखतात. याच्या वापराने केसांना नवजीवन मिळते आणि केस पुन्हा चमकदार होतात. जर तुमची टाळू कोरडी असेल तर अॅपल सायडर व्हिनेगर खूप प्रभावी ठरू शकते. ते लावल्याने केस तुटणे, खाज येणे, सूज येणे इत्यादी समस्याही दूर होतात.
अशा प्रकारे वापरा
हे वापरण्यास अतिशय सोपे आहे. यासाठी तुम्ही एका कपमध्ये दोन तृतीयांश अॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि उरलेले पाणी मिसळा. शॅम्पूने डोके धुतल्यानंतर केसांना लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळाने डोके धुवावे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Apple cider vinegar is beneficial for hair)