सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे? मग, रात्री झोपताना बदामाचे तेल कोमट करून चेहऱ्यावर लावा!

| Updated on: Jun 27, 2021 | 4:42 PM

लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे? मग, रात्री झोपताना बदामाचे तेल कोमट करून चेहऱ्यावर लावा!
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. (Apply almond oil on the skin to get glowing skin)

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर बदामाचे तेल कोमट करावे आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत हात आणि पायाला लावावे आणि थोडा वेळ हलक्या हाताने मालिश करावे. हे तेल आपल्या त्वचेवर रात्रभर तसेच ठेवा. हे केल्याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे तेल आपण दररोज लावले तर एक महिन्याच्या आतमध्ये आपली त्वचा चमकदार दिसण्यास सुरूवात होईल.

बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. हळूहळू, आपला रंग देखील उजळेल आणि त्वचा चमकू लागेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.

ब्लॅकहेड्सची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पेस्ट किंवा बदामाचे दुधाचा वापर आपण करू शकता. यासाठी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भिजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Apply almond oil on the skin to get glowing skin)