सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दररोज सकाळी ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा, वाचा !

| Updated on: Jun 16, 2021 | 7:37 AM

आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दररोज सकाळी हा फेसपॅक चेहऱ्याला लावा, वाचा !
फेसपॅक
Follow us on

मुंबई : आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला हळद, गुलाब पाणी, दही आणि खोबरेल तेल लागणार आहे. सर्वात अगोदर हळद, दही, गुलाब पाणी आणि खोबरेल तेल मिक्स करून घ्या. ही पेस्ट दहा मिनिटे तशीच ठेवा आणि संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. साधारण वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. (Apply this face pack on the face every morning to get beautiful skin)

दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 7 ते 8 चमचे बेसनाचे पीठ आणि लिंबाचा रस आणि मध घाला. ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि काही वेळ कोरडी होऊ द्या. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा धुवा. हे आठवड्यातून दोन वेळा त्वचेला लावले पाहिजे.

सर्व प्रथम एका भांड्यात 1 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात 2 चमचे पाणी घाला. दोन्ही गोष्टी चांगल्या मिसळा. चंदन पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचा थंड होते आणि चेहर्‍यावरील डाग कमी होतात. चंदनामुळे त्वचेत मेलेनिन वाढण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा तंदुरुस्त राहते. आपल्या चेहऱ्यावर कॉटन स्पंजच्या सहाय्याने तयार मिश्रण लावा. ही पेस्ट फक्त चेहर्‍यावर मर्यादीत ठेवण्यापेक्षा गळ्यावरही लावणे चांगले. जेणेकरून त्वचेला एकसारखा उजळपणा येईल. जर, कॉटन स्पंजच्या सहाय्याने लावण्यास त्रास होत असेल, तर आपण ही पेस्ट हाताने देखील त्वचेवर लावू शकता.

काकडीची बारीक पेस्ट तयार करून घ्या. पुदिन्याची पाने देखील बारीक कापून घ्या. एका पॅनमध्ये डबल बॉयलर भांडे ठेवून साबण वितळवून घ्यावा. वितळवलेल्या साबणामध्ये काकडीची पेस्ट आणि पुदिन्याची बारीक कापलेली पाने मिक्स करा. गॅस बंद करा आणि साबणाचे मिश्रण थंड होण्यास ठेवून द्या. साबणाचे मिश्रण एका साच्यामध्ये भरा. यानंतर साचा एक किंवा दोन तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या. साबणाची वडी तयार झाल्यानंतर साच्यातून अलगद काढावी.

(टीप : कोणतेही व्यायामप्रकार करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Fitness | वयाच्या 60व्या वर्षीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या ‘या’ योगासनांबद्दल…

Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!

(Apply this face pack on the face every morning to get beautiful skin)