मुंबई : निर्जीव केस केवळ आपल्या केसांची वाढ कमी करत नाहीत तर आपल्या केसांचे सौंदर्य देखील कमी करतात. केसांना पुरेसे पोषण मिळाले तर आपले केस निरोगी राहू शकतात. कमकुवत केसांमुळे डोक्यातील कोंडापासून विभाजीत केसांच्या समस्या उद्भवतात, अशा केसांना संपूर्ण पोषण आवश्यक असते. मात्र अनेक उपाय करून देखील आपले केस चांगले होत नाहीत. (Apply this hair mask to the hair and get rid of all the hair problems)
आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस मुलायम, चमकदार आणि सुंदर होतील. तुम्ही 2 ते 3 चमचे ताजे दही आणि टी ट्री ऑईल काही थेंब एकत्र मिसळा आणि ते सर्व टाळूवर लावा. आपल्या बोटांनी मालिश करा. एक तास सोडा. ते धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा. हे टी ट्री ऑईल आणि दह्याचा हेअर मास्क आठवड्यातून दोनदा लावला पाहिजे.
प्रत्येकाला मऊ, रेशमी आणि चमकदार केस हवे आहेत. जर तुम्हालाही या सर्व गोष्टी हव्या असतील तर तुम्ही केसांवर आणि स्काल्पवर दही लावू शकता आणि सुमारे 30 मिनिटे तसेच ठेवा. याशिवाय केसांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी कोरफड जेल, नारळाचे तेल दहीमध्ये मिसळून त्याचा हेअर मास्क तयार करू शकता.
दहीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत. जे डोक्यातील कोंडा आणि स्काल्पशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामुळे खाज सुटण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, दह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने आपल्या स्काल्पची मालिश करा आणि कोरडे होऊ द्या. व्यवस्थित कोरडे झाल्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Apply this hair mask to the hair and get rid of all the hair problems)