मुंबई : केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू आणि ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. परंतु अनेकदा ते केसांना चांगले करण्यापेक्षा जास्त नुकसान करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा शॅम्पूबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही घरी बनवू शकता आणि विशेष: केसांसाठी अजिबात हानिकारक नाही.
केस तुटणे, अकाली पांढरे होणे आणि कोंडा यासारख्या समस्या अनेकदा आपल्या रासायनिक शॅम्पूमुळे होतात. जर तुम्हाला ते टाळायचे असेल तर आम्ही तुम्हाला ऑर्गेनिक शैम्पूबद्दल सांगत आहोत. आपण ग्रीन टी, कोरफड, खोबरेल तेल आणि मुलतानी माती याच्या मदतीने घरचे घरी शैम्पू तयार करू शकता.
ग्रीन टी, कोरफड आणि बदाम तेल
हा खास शैम्पू तयार करण्यासाठी आपल्याला ग्रीन टीचे पाणी, कोरफड चार चमचे, बदाम तेल दोन चमचे आणि मुलतानी माती लागणार आहे. यासाठी सर्व एकत्र मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट केस धुताना आपल्या केसांना लावा. यामुळे आपल्या केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
कोरफडमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. जे तुमचे केस मऊ ठेवण्यास मदत करतात. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे, अमीनो अॅसिड, खनिजे, फॅटी अॅसिड भरपूर असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी फायदेशीर असतात. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल – 1/2 कप, कोरफड जेल – 1 कप आणि तेलाचे काही थेंब लागतील. सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा आणि फेटून घ्या. आपले केस ओले करा आणि नंतर आपल्या हातावर शैम्पू घ्या आणि आपल्या टाळूची मालिश करा. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक