सुंदर आणि चमकदार केस पाहिजे आहेत? मग, आठ दिवसांमधून एकदा तांदळाचे पाणी वापरा!

| Updated on: Jul 09, 2021 | 7:00 AM

केस सुंदर मिळवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. निरोगी आणि हेल्दी केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो.

सुंदर आणि चमकदार केस पाहिजे आहेत? मग, आठ दिवसांमधून एकदा तांदळाचे पाणी वापरा!
सुंदर केस
Follow us on

मुंबई : केस सुंदर मिळवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. निरोगी आणि हेल्दी केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपले केस सुंदर दिसण्यास मदत होतात. आज आम्ही तुम्हाला खास घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस सुंदर होतील. सुंदर आणि जाड केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (Applying rice water to hair is very beneficial)

जाड आणि नैसर्गिक चमच केसांवर आणण्यासाठी आणि केस गळती कमी करण्यासाठी आपण आपल्या केसांना आठ दिवसातून किमान एकदा तरी तांदळाचे पाणी लावले पाहिजे. हे आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. केस गळतीमुळे केस वाढत नाहीत किंवा इतर समस्या उद्भवत असतील, तर तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये असणारे अमीनो आम्ल केस गळण्यास प्रतिबंधित करतात. तांदळामध्ये व्हिटामिन बी, सी आणि ई आढळतात, जे केसांची वाढ सुधारण्यास उपयुक्त ठरतात.

तांदळाच्या पाण्यात कर्बोदक आणि इनोसिटॉल असते. ज्यामुळे केस मजबूत होण्यास तसेच दाट होण्यास मदत होते. सुमारे 10 ते 15 मिनिटे हलकी हाताने केसांच्या टाळूची मालिश करा. मग पाण्याने केस धुवा.  तांदळ्याच्या पाण्यामध्ये आपण खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावू शकतो. यामुळे केस गळतीची समस्या दूर होते आणि आपल्या केसांवर एक चमक येते. मात्र, केसांवर तांदळाचे पाणी लावताना हे नेहमीच लक्षात ठेवा की, तांदळाचे पाणी हे ताजी असावे.

एका भांड्यात तांदूळ आणि त्यापेक्षा दुप्पट पाणी घाला आणि उकळवा. उकळल्यानंतर भांडे मंद आचेवर झाकून ठेवा आणि थोडावेळ पाणी उकळू द्या. यानंतर, एक भात एका चमच्याने बाजूला काढा आणि तो व्यवस्थित शिजला आहे की, नाही ते तपासा. शिजल्यानंतर भात चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या व एका भांड्यात ते पाणी काढून घ्या. हे पाणी केसांवर वापरा. हे पाणी प्यायचे असल्यास, त्यात थोडे तूप आणि मीठ घाला आणि नंतर प्या.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Applying rice water to hair is very beneficial)