हिवाळ्यात हेअर स्पा करतांना या चुका टाळा, अन्यथा केसांचे होईल नुकसान

| Updated on: Jan 13, 2025 | 7:20 AM

हिवाळ्यामध्ये हेअर स्पा केल्याने केस चमकदार होतात पण त्यासोबतच हेअर स्पा करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळ्यामध्ये हेअर स्पा करताना या गोष्टींची काळजी घेतली नाही तर केस खराब होण्याची शक्यता निर्माण होते.

हिवाळ्यात हेअर स्पा करतांना या चुका टाळा, अन्यथा केसांचे होईल नुकसान
Hair Spa
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिवाळ्यात फक्त त्वचेचीच नाही तर केसांची ही जास्त काळजी घ्यावी लागते. थंड वाऱ्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात त्यामुळे टाळू कोरडी होऊन केस तुटू लागतात. केसांची काळजी घेण्यासाठी अनेक जण हेअर स्पा करतात. यामुळे केस मजबूत तर होतातच पण ते चमकदार देखील होतात. पण हिवाळ्यामध्ये हेअर स्पा करताना काही चुका होत असतात. त्यामुळे केस खराब होण्याची शक्यता जास्त असते. जाणून घ्या हिवाळ्यात केस खराब होऊ नये म्हणून हेअर स्पा करताना कोणत्या चुका टाळणे आवश्यक आहे.

तेल लावणे टाळा

काहीजण हेअर स्पा केल्या नंतर तेल लावतात. पण हेअर स्पा केल्यानंतर लगेच तेल किंवा कोणतेही प्रकारचे हेअर पॅक लावू नका. हेअर पॅक किंवा तेल लावल्यामुळे केसांची चमक कमी होऊ शकते. त्यामुळे काही दिवस डोक्याला तेल लावणे टाळा.

योग्य उत्पादने निवडा

हेअर स्पा साठी तुम्ही योग्य उत्पादने वापरा. चुकीच्या उत्पादनामुळे केसाचे अधिक नुकसान होऊ शकते. हिवाळ्यात केसांना खोलपर्यंत आर्द्रता आणि पोषण मिळणे आवश्यक असते. त्यामुळे हेअर स्पा साठी अशी काही उत्पादने निवडा ज्या मध्ये नैसर्गिक तेल, ह्युमेक्टंट्स आणि जीवनसत्वे यांचा समावेश असेल.

केस मोकळे सोडू नका

हिवाळ्यात हेअर स्पा केल्यानंतर केस मोकळे सोडू नका ते शक्य होईल तेवढे झाकून ठेवा. केस मोकळे ठेवल्याने केसांमध्ये धूळ आणि घाण साचू शकते त्यामुळे ओलावा कमी होऊ शकतो. प्रदूषणामुळे ही केसांची चमक कमी होऊ शकते.

वारंवार केस धुणे टाळा

हेअर स्पा केल्यानंतर केस वारंवार धुतल्याने नैसर्गिक तेलाचा थर निघून जाऊ शकतो. त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. हेअर स्पा केल्यावर केस वारंवार धुणे टाळा. तसेच केस गरम पाण्याने धुऊ नका. असे केल्याने केसांची आर्द्रता निघून जाते. ज्यामुळे केस अधिक कोरडे होऊ शकतात. हेअर स्पा केल्यानंतर केस नेहमी कोमट पाण्याने धुवा. जेणेकरून केसांची आर्द्रता टिकून राहील.