मेकअप करताना या चुका टाळा, अन्यथा चेहरा दिसेल चेहरा विद्रुप

| Updated on: Jan 13, 2025 | 8:25 AM

मेकअप करताना ऋतू लक्षात घेऊन मेकअप करणे आवश्यक असते. हिवाळ्यात बहुतेक महिला मेकअप करताना काही सामान्य चुका करतात. ज्यामुळे चेहरा सुंदर दिसण्याऐवजी खराब दिसू लागतो. जाणून घेऊ हिवाळ्यात मेकअप करताना कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे.

मेकअप करताना या चुका टाळा, अन्यथा चेहरा दिसेल चेहरा विद्रुप
Makeup Tips
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील कोरडेपणा वाढतो त्यामुळेच मेकअप करतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात मेकअप करताना घाम न येता मेकअप बराच काळा टिकावा हे लक्षात ठेवणे आवश्यक असते त्याचप्रमाणे हिवाळ्यात मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा मेकअप केल्यावर तुमचा चेहरा सुंदर दिसण्याऐवजी तो खराब दिसू शकतो. साधारणपणे हिवाळ्यात बहुतेक महिला मेकअप करताना काही चुका करतात. रोजच्या रुटीन मध्ये हलका मेकअप केला जातो. याशिवाय लग्नाच्या सीजन पासून ते हिवाळ्याच्या दिवसांपर्यंत अनेक सण येत असतात आणि या प्रसंगी मेकअप करायचा असेल तर काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जाणून घेऊ हिवाळ्यात मेकअप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

मॉइश्चरायझर लावायला विसरू नका

अनेक महिला मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावत नाही कारण त्यांना वाटते की चेहरा तेलकट दिसेल. हिवाळ्यात मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावले नाही तर तुमचा बेस कोरड्या त्वचेत संपूर्णपणे मिसळत नाही. त्यामुळे मेकअप पॅची दिसेल आणि चेहऱ्यावरील क्रॅक दिसू लागतील.

चुकीचे फाउंडेशन निवडणे

हिवाळ्यात मेकअपची उत्पादने देखील त्याप्रमाणे निवडणे गरजेचे आहे. बहुतेक स्त्रिया एकाच प्रकारचा मेकअप सोबत ठेवतात आणि प्रत्येक ऋतूंमध्ये तोच वापरतात. हिवाळ्याच्या दिवसात मॅट फिनिश ऐवजी लिक्विड किंवा क्रीम फाउंडेशन अधिक चांगले असते. कारण ते कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतेत्यामुळे फ्लॉलेस लुक मिळायला मदत होते.

भडक रंग टाळा

हिवाळ्यात हलके शेड्स वापरण्याचा प्रयत्न करा. हिवाळ्यात भडक रंग चांगला लुक देत नाही. जर तुम्हाला नॅचरल लूक आवडत असेल तर तुम्ही आवर्जून भडक रंग टाळा. बेबी पिंक, ब्राऊन, पिच कलर इत्यादी लाईट शेड्स निवडा यामुळे तुमची त्वचा फ्रेश दिसेल.

थेट ओठांवर लिपस्टिक लावणे टाळा

हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे आणि मॉइश्चरायझर लावल्याच्या पाच ते दहा मिनिटानंतर मग लिपस्टिक लावा. यामुळे तुमच्या ओठांना चांगली फिनिशिंग मिळेल आणि क्रॅक दिसणार नाही. ओठांवर जास्त कोरडेपणा असल्यास प्रथम हलक्या स्क्रबने एक्सपोलिएट करा आणि नंतर लिपबाम लावल्यानंतर लिपस्टिक लावा.

क्रीम बेस मेकअप नसणे

हिवाळ्यात त्वचेचे हायड्रेशन कमी होते. त्यामुळे फक्त क्रीम आधारित मेकअप वापरणे चांगले असते.अनेक वेळा याकडे लक्ष न दिल्याने त्वचा कोरडी पडते आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. हिवाळ्यात फाउंडेशन पासून ते ब्रश, आयशाडो, हायलाईटर, कन्सिलर पर्यंत सर्व उत्पादने क्रीम बेस निवडावीत यामुळे तुम्हाला नॅचरल लूक मिळेल.