Skin Care : केळी आणि दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा! 

| Updated on: Aug 08, 2021 | 7:05 AM

त्वचा सुंदर आणि चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

Skin Care : केळी आणि दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा! 
फेसपॅक
Follow us on

मुंबई : सुंदर आणि चमकदार त्वचा बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. साैंदर्य उत्पादनांचा अधिक वापर केल्याने आपली त्वचा काही काळ सुंदर दिसण्यास मदत होते. मात्र, जर आपण घरगुती फेसपॅक लावले तर आपली त्वचा कायमची सुंदर दिसते. (Banana and curd face pack is beneficial for the skin)

केळी आणि दही फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला 1 पिकलेले केळी मॅश, दही 1 टीस्पून, मध 1 टीस्पून आणि लिंबाचा रस 1 टीस्पून लागेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी, एका वाडग्यात मॅश केलेले केळी आणि दही घाला. नंतर त्यात मध आणि लिंबाचा रस घालून सर्व मिक्स करून मऊ पेस्ट बनवा. हा फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि तो सुकेपर्यंत सोडा आणि धुवा.

लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि ते आपल्याला चमकदार आणि स्वच्छ त्वचा देण्यास मदत करते. चमकदार त्वचेसाठी केळी खूप फायदेशीर आहे. केळ्याची साल दात पांढरे करण्यासाठी खूप चांगली आहे. दही एक मॉइश्चरायझिंग एजंट आहे. मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी मध आणि चंदन पावडर मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा.

या पेस्टमध्ये शेवटी साखर मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर त्वचेचा मसाज करा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Banana and curd face pack is beneficial for the skin)