Skin Care : काॅफी, गुलाब पाणी आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी फायदेशीर, वाचा!

| Updated on: Jun 30, 2021 | 9:15 AM

लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

Skin Care : काॅफी, गुलाब पाणी आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी फायदेशीर, वाचा!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी आपण घरगुती उपाय करूनही आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो. विशेष म्हणजे घरगुती उपाय केल्याने आपल्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. (Coffee, rose water and honey face pack are beneficial for the skin)

काॅफी, गुलाब पाणी आणि मधाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला दोन चमचे काॅफी, गुलाब पाणी दोन चमचे आणि मध तीन चमचे लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण दररोज चेहऱ्याला लावला पाहिजे.

कॉफी त्वचेमध्ये एक्फोलीएटर म्हणून कार्य करते जे टॅन काढून टाकण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करते. यासाठी, आपल्याला एका भांड्यात एक चमचा कॉफी, दही आणि एक चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करावी लागेल. नंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

फेस पॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर एक चमचा मधात व्यवस्थित मिसळा आणि हातांनी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावर ठेवा. मग आपले तोंड धुवा. खरं तर, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि चेहर्‍यावरील सुरकुत्याची समस्या दूर होते.

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health Tips | कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर राहावं लागतंय? मग, निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Coffee, rose water and honey face pack are beneficial for the skin)