मुंबई : केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळणे कमी करण्यासाठी आपण घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता. यासाठी आपण कढीपत्ता देखील वापरू शकता. कढीपत्त्यामुळे केस गळणे कमी होण्यास मदत होते. कढीपत्ता बहुतेक लोकांच्या घरात आढळतो. कढीपत्त्यामध्ये केसांसाठी फायदेशीर असे गुणधर्म आहेत. कढीपत्त्यामध्ये फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि निकोटीनिक अॅसिड भरपूर असते. (Curry Leaves hair mask is beneficial to prevent hair loss)
कढीपत्ता, आवळा आणि मेथी – आपण केस गळती थांबवण्यासाठी कढीपत्ता वापरू शकता. कढीपत्ता, आवळा आणि मेथीचा खास हेअर पॅक घरी तयार करू शकतो. यासाठी आपल्याला 10-15 कढीपत्त्याची पाने, मेथी पावडर आणि आवळा पूड दोन चमचे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी एकत्र मिक्स करा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून आपल्या केसांना लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर ठेवा आणि कोमट पाण्याने केस धुवा. या हेअर पॅकमुळे आपली केस गळती कमी होण्यास मदत होते.
कढीपत्ता आणि नारळ तेल – नारळ तेल आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण केसांचे टॉनिक बनवण्यासाठी कढीपत्त्यासह नारळ तेल मिक्स करू शकता. यासाठी तुम्ही नारळाचे तेल घ्या आणि त्यात कढीपत्ता घाला. आता हे मिश्रण गरम करा. मिश्रण थंड होऊ द्या आणि स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा. या मिश्रणाने आपल्या टाळूची संपूर्ण मालिश करा. हे आपल्या केसांवर मुळापासून टोकापर्यंत लावा. काही तास असेच ठेवा. त्यानंतर केस धुवा. आपण हे मिश्रण तयार करुन ठेवू शकतो. यामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.
कढीपत्याचे फायदे – कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे आणि पांढरे केस ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल तर आपण कढीपत्त्याचा वापर केसांसाठी केला पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Curry Leaves hair mask is beneficial to prevent hair loss)