हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हिवाळा सुरु होताच अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. मात्र, अनेकजण हिवाळ्यात गरम पाण्यानी अंघोळ करण्यास पसंती देतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, गरम पाण्यानी अंघोळ केल्यास तुमच्या शरीरासा ऊर्जा मिळते. त्यासोबतच तुमच्या शरीरावरचे बॅक्टिरिया मरुन जातात आणि त्वचे संबंधित रोग होत नाहीत. गरम पाण्यानी अंघोळ केल्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला, ताप यांच्यासारखे आजार होत नाहीत. परंतु जास्त प्रमाणात गरम पाण्यानी अंघोळ करणं तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं.
जास्त प्रमाणात गरम पाण्यानी अंघोळ केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील मॉईश्वर निघून जाण्यास मदत होते. त्यासोबतच त्वचा ड्राय होऊन तिच्यावर क्रॅक्स येऊ लागत. अनेक लोकांना तर गरम पाण्यानी अंघोळ केल्यामुळे त्वचेवर बारीक पुरळ आणि रॅशेसच्या समस्या उद्भवतात.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चेहरा धुताना कधीच गरम पाण्याचा वापर करु नये. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. त्याचसोबत चेहऱ्यावरील पोर्स ओपन होऊन त्यामध्ये बॅक्टिरिया प्रवेश करतात. गरम पाणी तुमच्या केसांसाठी सुद्धा अत्यंत धोकादायक ठरु शकतं. केस धुताना गरम पाण्याचा वापर केल्यामुळे केसामध्ये कोंडा, केसगळतीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे केस धुताना देखील कोमट पाण्याचा वापर करा. रिपोर्ट्स नुसार गरम पाण्याने 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ करू नये. असे केल्यामुळे शरीरावरील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा ड्राय होऊन अनेक समस्या उद्भवतात.
नेहमी अंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चे दूध, मध किंवा गुलाब पाणी मिसळा आणि त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल टिकून रहाण्यास मदत होते. त्यासोबतच कोणत्याही प्रकारचे त्वचेचे विकार होत नाहीत. कोमट पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाहीत आणि तुमची त्वचा हेल्दी रहाण्यास मदत होते.