निरोगी राहण्यासाठी आपल्या आहाराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आरोग्य तज्ञ नेहमीच पोषक तत्त्वांनी युक्त अन्न खाण्याचा सल्ला देतात. चांगल्या आरोग्य राखण्यासाठी सर्व पोषक तत्त्वांनी युक्त संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. कारण हे पोषक तत्वे आपल्या शरीरात अनेक महत्त्वपूर्ण कार्य करतात. ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते.
आपल्या सर्वांना माहिती आहे की पोषक तत्वे आपल्या शरीरात अनेक कार्य करतात. अशा परिस्थितीत शरीरात या घटकांची कमतरता असल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. ज्याप्रमाणे शरीर आजारी असल्यास काही लक्षणे आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे शरीरात विविध पोषक घटकांची कमतरता असल्यास त्याची सुद्धा लक्षणे आपल्याला शरीर देते. शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊ.
जर तुमची त्वचा अचानक कोरडी आणि त्यावर सुरकुत्या दिसायला लागल्या तर ते निर्जलीकरण, आवश्यक फॅटी ॲसिडस, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता असल्याची लक्षणे आहेत. हे सर्व पोषक घटक त्वचेला हायड्रेट ठेवतात त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करतात.
जास्त केस गळणे अजिबात सामान्य नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तुमचे केस खूप गळत असतील तर हे प्रथिने, लोह आणि बायोटिन तसेच व्हिटॅमिन डी सारख्या जीवनसत्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
जर तुमची नखे सहज तुटत असतील तर ते जास्त लोह किंवा बायोटिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. मजबूत आणि निरोगी नखे राखण्यासाठी हे सर्व पोषक घटक आवश्यक आहेत. त्यामुळे त्याचा आहारात नक्की समावेश करा.
जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर ते तुमच्या शरीरात लोह, व्हिटॅमिन बी १२ किंवा कॅलरीजची कमतरता असल्याचे लक्षण आहे. ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे पोषक घटक आवश्यक आहे आणि म्हणूनच त्यांच्या कमतरतेमुळे तुम्हाला सुस्त वाटू शकते.