मुंबई : पावसाळा आपल्या सर्वांना आवडत असला तरी देखील पावसाळ्याच्या हंगामात आरोग्यासाच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या हंगामात, काही लोकांच्या हात आणि पायातून त्वचा बाहेर येऊ लागते. हे पाहून विचित्र वाटते. मात्र, काळजी करण्यासारखे काहीच नाही. काही दिवसात ते बरे होते. जर तुम्हाला या समस्येपासून लवकरात लवकर सुटका मिळवायची असेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत. (Do these home remedies to take care of the skin of hands and feet in the rainy season)
मॉइश्चरायझर वापरा
त्वचेला भेगा पडणे किंवा सोलणे याचे मुख्य कारण कोरडी त्वचा आहे. मॉइश्चरायझर त्वचा मऊ आणि लवचिक बनवण्यासाठी मदत करते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरा.
मध वापरा
मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. मधात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे त्वचेचे संक्रमण बरे करण्यास मदत करतात. जर तुमची संवेदनशील त्वचा असेल तर तुम्ही मध वापरू शकता. त्वचा मऊ ठेवण्यासाठी तुम्ही त्याचा थेट वापर करू शकता.
अंघोळीसाठी कोमट पाणी घ्या
पावसाळ्यात त्वचा खूप लवकर कोरडी होते. त्यामुळे आंघोळीसाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा. हे त्वचेतून तेल कमी करण्यास मदत करते.
निरोगी आहार
तज्ञांच्या मते, निरोगी अन्न आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुमच्या वाईट खाण्याच्या सवयी तुमच्या त्वचेच्या समस्या वाढवू शकतात. आहारात पौष्टिक आहार घ्या. नट, मासे आणि कडधान्य आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.
त्वचेला उन्हापासून वाचवा
सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. जास्त वेळ उन्हात राहिल्याने सनबर्न, रॅशेस सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे घराबाहेर काढताना शरीर झाकून ठेवा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Do these home remedies to take care of the skin of hands and feet in the rainy season)