मुंबई : आपल्याला सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर आपण केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुंदर केसांसाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपले केस सुंदर होण्यास मदत होते. घरगुती उपायामुळे केस सुंदर आणि निरोगी होण्यास मदत होते. हे केसांच्या वाढीस मदत करते. हे केस गळणे देखील कमी करू शकते.
(Do this home remedy to get beautiful hair)
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपण मीठ वापरू शकतो. यासाठी आपल्याला शैम्पूमध्ये मीठ मिक्स करून केसांना लावावे लागेल. हे मिश्रण केसांवर वीस ते तीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपले केस धुवा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होण्यास मदत मिळेल. हा उपाय आपण आठ दिवसातून दोन वेळा केसा पाहीजे.
तुम्हाला 1 कप नारळाचे दूध, 1 कप कॅस्टाइल साबण, व्हिटॅमिन ई तेलाचे 2 कॅप्सूल आणि आवश्यक तेलाचे 15-20 थेंब लागतील. सर्व साहित्य एकत्र करा आणि ते शॅम्पूच्या बाटलीत साठवा. आपले केस ओले करा आणि मिश्रण आपल्या नियमित शैम्पू म्हणून वापरा. यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.
केसांच्या हा खास हेअर मास्क तयार करण्यासाठी सुध्द तूप तीन चमचे, दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा खोबरेल तेल मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि ही संपूर्ण पेस्ट आपल्या केसांना लावा. त्यानंतर साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.
लिंबाचा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावावा. 10 ते 15 मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार होतील आणि डोक्यातील कोंडा आणि खाजही दूर होण्यास मदत होईल. खोबरेल तेल केसांना मॉयश्चरायझ करण्याचे काम करते. खोबऱ्याचे तेल थोडसे कोमट करून त्याने डोक्याचा मसाज करावा. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Do this home remedy to get beautiful hair)