मुंबई : चेहरा आणि केस सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक उपाय किंवा घरगुती उपाय करत असतो. मात्र, या तुलनेने हाता-पायांच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्वचा रुक्ष होणं, पायांच्या टाचांना भेगा पडणे, गुडघे काळे होणे यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी गुडघ्यांचा आणि कोपऱ्याचा काळपटपणा कसा दूर करायचा हे सांगणार आहोत. (Do this home remedy to get rid of dark circles on the hands)
नारळाचे तेल – नारळाचे तेल वापरल्याने गुडघे आणि कोपरांचा काळसरपणा दूर होतो. त्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेला मॉइस्चराइज करण्यास मदत करते. तसेच काळेपणा दूर होण्यास मदत होते. आठवड्यातून 2 ते 3 दिवस खोबरेल तेल वापरल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.
लिंबू – लिंबू त्वचेमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. तसेच त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.
दही- दहीमध्ये लैक्टिक अॅसिड असते. जे त्वचेचा रंग हलका करण्यास मदत करते. याशिवाय, ते त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते. आपण थेट कोपर आणि गुडघ्यांवर दही वापरू शकता. थोडा वेळ दही ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.
संत्र्याची साल – कोपर आणि गुडघ्यांच्या काळेपणापासून मुक्त होण्यासाठी संत्र्याची साल खूप उपयुक्त आहे. यासाठी तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर लागणार आहे. या पावडरमध्ये थोडे दूध आणि गुलाब पाणी घाला. ही पेस्ट काळ्या झालेल्या भागावर लावा आणि काही वेळाने पाण्याने धुवा.
बटाटा – कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला बटाट्याचा तुकडा कोपर आणि गुडघ्यांवर सुमारे 5 मिनिटे घासून नंतर पाण्याने धुवावा लागेल. हा उपाय दिवसातून दोनदा केल्यास नक्कीच फायदा दिसून येईल.
काकडी – काकडी त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यात मदत करते. यासाठी काकडीच्या रसात हळद मिसळून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट कोपर आणि गुडघ्यांवर लावा आणि सुमारे अर्धा तास सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Do this home remedy to get rid of dark circles on the hands)