Skin Care : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात? मग ‘हा’ फेसपॅक नक्की वापरा!

| Updated on: Jul 28, 2021 | 6:22 PM

खरोखरच आपल्याला सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती फेसपॅक वापरले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.

Skin Care : कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात? मग हा फेसपॅक नक्की वापरा!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : खरोखरच आपल्याला सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती फेसपॅक वापरले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा आणि केस दोन्हीसाठी फायदेशीर आहे. यामुळे आपण घरचे-घरी तयार करून बदामाचे फेसपॅक वापरले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. (Do this home remedy to get rid of the problem of skin dry )

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण खास बदामाचा हा फेसपॅक घरी तयार केला पाहिजे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचे ओट्स, 1 चमचे बदाम पावडर आणि 1-2 चमचे कच्चे दूध लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून याची चांगली बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याची मालिश करा. 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा.

जर आपल्याला निरोगी आणि चमकणारी त्वचा हवी असेल तर आपण किवीचा फेस मास्क लावू शकता. यासाठी आपल्याला किवी सोलून बारीक करावी लागेल आणि मग हे मिश्रण चेहरा आणि मान वर लावावे. सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. किवी त्वचेतून बाहेर पडणारे सीबमला नियंत्रित करण्यात मदत करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या कमी होते. या व्यतिरिक्त हे अँटी-एजिंगची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करते. सुरकुत्या आणि बारीक पुरळ वाढण्यास प्रतिबंधित करते.

किवी आणि बदामाचा फेसपॅक त्वचेसाठी खूप चांगला असतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी रात्री काही बदाम पाण्यात भिजवावे व सकाळी थोडे बेसन पीठ, बदाम आणि किवीची पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. काही दिवसात चेहरा सुंदर दिसेल. दही आणि किवीचा फेसपॅक तयार करम्यासाठी आपल्याला किवीच्या पेस्टमध्ये थोडे दही घालावे लागेल. या दोन गोष्टी एकत्र करून पेस्ट बनवा. सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर ही पेस्ट धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do this home remedy to get rid of the problem of skin dry )