Cracked heels : टाचांना भेगा पडल्यात?, काळजी करु नका, ‘हे’ सोपे घरगुती उपाय करा!

| Updated on: Jun 25, 2021 | 10:58 AM

आपल्या हात आणि चेहरा प्रमाणेच, आपल्या पायांना देखील मॉइश्चरायझेशनची गरज असते. आपण पायाच्या त्वचेकडे दुर्लक्ष केले तर अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

Cracked heels : टाचांना भेगा पडल्यात?, काळजी करु नका, हे सोपे घरगुती उपाय करा!
टाचांची काळजी
Follow us on

मुंबई : आपले हात आणि चेहरा प्रमाणेच, आपल्या पायांना देखील मॉइश्चरायझेशनची गरज असते. आपण पायाच्या त्वचेकडे दुर्लक्ष केले तर अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्या पायाची त्वच्या त्वचा क्रॅक होऊ लागते. या व्यतिरिक्त, आपल्या पायांच्या त्वचेचा अजूबाजुचा भाग कडक होतो. टाचांना मोठ-मोठ्या भेगा देखील पडतात. आपल्या टाचांची काळजी घेण्यासाठी आपण घरगुती उपाय देखील करू शकतो. (Do this home remedy to remove cracked heels)

मीठ आणि तेल

आपण आपल्या पायांसाठी मीठ आणि तेल वापरू शकता. कोमट पाण्यात काही थेंब लव्हेंडर, नीलगिरी किंवा पेपरमिंट तेल मिक्स आणि त्यामध्ये मीठ घाला. साधारण वीस मिनिटे त्यामध्ये आपले पाय ठेवा. यामुळे आपल्या पायांचा काळपटपणा निघून जाईल.

लिंबू आणि साखर

लिंबू आणि साखर आपल्या पायांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला लिंबाचे अर्धे तुकडे आणि 3 चमचे साखर आवश्यक असेल. साखरेमध्ये लिंबू बुडवून घ्या आणि टाचेवर मालिश करा. साधारण दहा मिनिटे हे करा आणि त्यानंतर कोमट पाण्याने पाये धुवा.

कोरफड जेल

कोरफड जेलमध्ये अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात. कोरफड जेल अनेक सौंदर्य उत्पादनामध्ये वापरले जाते. पायांच्या भेगांसाठी कोरफड फायदेशीर आहे. यासाठी प्रथम आपले पाय चांगले स्वच्छ करा आणि ताजे कोरफड जेल योग्यरित्या लावा. दहा मिनिटांसाठी पाय थंड पाण्याने धुवा.

मध आणि लिंबू

मध आणि लिंबू आपल्या पायांसाठी खूप फायदेशीर आहे. मध आणि लिंबू एकत्र मिसळून टाचांना लावल्याने रुक्षपणा कमी होतो. तसेच, यामुळे आपली पायांवरचा काळपट कमी होतो. यामुळे आपण दररोज मध आणि लिंबू पायांना लावले पाहिजे.

बेकिंग सोडा पेस्ट
बेकिंग सोडा आपण किचनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो. वापरण्याशिवाय बेकिंग सोडा त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. बेकिंग सोडा थेट चेहऱ्यावर कधीही वापरु नका. मात्र, बेकिंग सोडा वापरुन आपण पाय बरे करू शकतो. 2 चमचे बेकिंग सोडा, अल्युमिनियम फॉइल पेपर आणि पाणी, एका भांड्यात बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. या पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. यानंतर, पाय साबणाने धुवा. यानंतर हे मिश्रण आपल्या पायावर लावा आणि त्यास अ‍ॅल्युमिनियम फॉइलने झाकून टाका. आपण ही पेस्ट सुमारे एक तास ठेवा आणि नंतर पाय पाण्याने धुवा.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Food | थंडीतही शरीरासाठी लाभदायक, व्हिटामिन्सयुक्त मटार खाण्याचे ‘हिवाळी’ फायदे

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(Do this home remedy to remove cracked heels)