मुंबई : अत्यंत कमी वयामध्ये पांढऱ्या केसांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. अनेक उपाय करूनही पांढऱ्या केसांची समस्या काही कमी होत नाही. बर्याचदा योग्य पोषणाच्या कमतरतेमुळे आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील केस पांढरे होऊ लागतात. पांढरे केस लपवण्यासाठी जर तुम्ही हेअर डाय किंवा कृत्रिम हेअर कलर वापरत असाल तर त्याने केसांच्या इतर समस्या वाढण्याची शक्यता निर्माण होते. (Do this remedy to get rid of the problem of white hair)
पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केला पाहिजे. ज्यामुळे काही दिवसांच्या आतमध्येच आपली पांढऱ्या केसांची समस्या दूर होते. पांढरे केस दूर करण्यासाठी आपण घरी एक खास तेल तयार केले पाहिजेत. हे तेल करण्यासाठी आपल्याला दोन चमचे आवळा पावडर, एक चमचा कडीपत्ताची पेस्ट, जास्वंदाच्या फुलाची पेस्ट आणि खोबरेल तेल लागणार आहे.
वरील सर्व साहित्य खोबरेल तेलामध्ये मिक्स करा आणि गॅसवर वीस मिनिटे गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर हे तेल थंड होईद्या आणि आपल्या संपूर्ण केसांना लावा. यामुळे आपले पांढरे केस कमी होण्यास मदत होते. कढीपत्ता केसांच्या मुळांची ताकद वाढवतो आणि केसांना आवश्यक पोषक प्रदान करते. यासाठी कढीपत्ता नारळाच्या तेलात घाला आणि तडतडेपर्यंत गरम करा. नंतर ते तेल गळून घ्या आणि त्याने केसांची मसाज करा. सुमारे 30-45 मिनिटांनंतर केस धुवा.
आठवड्यातून दोनदा या प्रक्रियेचे अनुसरण करा मेंदी आणि तेजपत्ता या दोन्ही वनस्पतींनी केसांचा रंग अधिक गडद होतो. अर्धी वाटी कोरडी मेंदी आणि तमालपत्रात दोन कप पाणी मिसळून उकळा. थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि केस धुतल्यानंतर त्यांच्यावर चांगले लावा. 15-20 मिनिटांनंतर केस पुन्हा धुवा. शरीरात ‘व्हिटामिन बी’ची कमतरता निर्माण झाल्यास आपल्या डोक्यावरील केस पांढरे होऊ लागतात आणि मग काही काळाने ते गळू देखील लागतात.
संबंधित बातम्या :
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Do this remedy to get rid of the problem of white hair)