केळी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. केळी खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि पचनसंस्था ही निरोगी राहते. पण केळी खाल्ल्यानंतर त्याची साल लगेच फेकून दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की केळीची साल ज्याला आपण निरुपयोगी समजतो आणि कचरा म्हणून टाकून देतो ती आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केळीची साल कचरा नसून ती तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले पोषक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म फकत तुमची त्वचा सुधारत नाही तर ती निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करते.
केळीच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट त्वचेचे पोषण करतात आणि ती सुधारतात. यामुळे त्वचेचा निस्तेज पणा कमी होतो आणि त्वचा चमकदार बनते. केळीच्या सालीचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याला एक वेगळीच चमक येते.
जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील म्हणजेच तुम्हाला डार्क सर्कल्सचा त्रास होत असेल तर केळीच्या सालीचा वापर करा. केळीची साल डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यातील पोषक घटक त्वचेला हायड्रेट करतात आणि डार्क सर्कल्स हलके करण्यास मदत करतात.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासही केळीची साल मदत करते. त्याच्या वापरामुळे त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचा घट्ट करतात आणि सुरकुत्या कमी करतात.
त्वचेवर थेट लावा: केळीच्या सालीच्या आतील भाग प्रभावित भागावर हलक्या हाताने घासून घ्या. दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे मुरूम आणि डार्क सर्कल्स कमी होतील.
फेस मास्क तयार करा: केळीची साल बारीक करून त्यात मध आणि लिंबाचा रस घालून फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा. हा फेस पॅक त्वचेला उजळ आणि चमकदार व्हायला मदत करतो.