मुंबई : आपल्याला खरोखरच सुंदर आणि तजेलदार त्वचा पाहिजे. असेल तर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक वाटी द्राक्षचा रस पिला पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षाचा रस अधिक फायदेशीर ठरतो. (Drinking grape juice is beneficial for health)
द्राक्षाचा रस घरी तयार करण्यासाठी आपल्याला सात ते आठ द्राक्ष लागणार आहे. सर्वात अगोदर द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सरमध्ये रस करून घ्या. हा रस लगेचच प्या. यामुळे आपल्या त्वचेचा अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. हा रस आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिला पाहिजे. हा रस आपल्या त्वचेसाठीच नाहीतर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्याची समस्या दूर करण्यासाठी आपण चेहऱ्याला द्राक्षाचा रस लावला पाहिजे. द्राक्षाचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर आपण दररोज दिवसातून दोन वेळा द्राक्षाचा रस आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल.
द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारख्या अनेक घटक असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे ज्या लोकांना हे रोग आहेत त्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ले पाहिजेत.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते. द्राक्ष खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना फायद्याचं ठरणार आहे.
(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Toothache | या कारणांमुळे दातात होतात वेदना, हे घरगुती उपाय देतील आराम
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drinking grape juice is beneficial for health)