मुंबई : मुरुमाच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत. मुख्यत: तेलकट त्वचेमुळे मुरूमाची समस्या निर्माण होते. मुरूमामुळे तुमच्या भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो. बाजारामध्ये मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारची आैषधे उपलब्ध आहेत. मात्र, ही आैषधे काही काळापर्यंत आपल्या चेहऱ्यावर परिणाम करतात, त्यानंतर परत मुरूमाची समस्या निर्माण होते. जर आपल्याला मुरूमाची समस्या कायमस्वरूपी दूर करायची असेल तर आपण घरगुती उपाय नेहमीच केले पाहिजेत. (Eliminate the problem of oily problem with these natural remedies)
मध
मध बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. हे मुरूमासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण थेट मध चेहऱ्यावर लावू शकता. मध हे जीवनसत्त्वे, अमीनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्सपासून बनलेले असते जे तुमच्या चेहऱ्यावर सुखदायक प्रभाव टाकतात. तुम्ही चेहऱ्यावर कच्चे मध लावू शकता किंवा त्यात लिंबाचा रस घालू शकता. मिश्रण तयार करा आणि कॉटन बॉलने चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे सोडा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईल दाहक-विरोधी गुणधर्मांनी भरलेले आहे. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म आहेत. जे जादा तेलावर नियंत्रण ठेवतात आणि छिद्रांना चिकटण्यास प्रतिबंध करतात. टी ट्री ऑईल आणि बेसन पीठ मिक्स करून आपण चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते.
मुलतानी माती
मुलतानी माती जास्त तेल शोषण्यास मदत करते आणि बदाम पावडर आपल्या त्वचेतील घाण काढून टाकण्यास मदत करते. 1 चमचा मुलतानी माती, 2 चमचा बदाम पावडर मिक्स करा. या मिश्रणात गुलाब पाण्याचे काही थेंब मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. हा पॅक आपल्या चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे हा पॅक आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
बदाम तेल
बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा आणि केस दोन्हीसाठी फायदेशीर आहे. याशिवाय केसांसाठी बदाम तेलही वापरता येते. बदाम पचविणे एवढे सोपे नाही. पण भिजवलेले बदाम सहज पचतात. याव्यतिरिक्त, हे एंजाइमचे उत्पादन वाढवते, जे पाचन तंदुरुस्त ठेवते. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Eliminate the problem of oily problem with these natural remedies)