मुंबई : बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. यामुळे प्रत्येक हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाण्याची गरज नसते. आपण काही घरगुती उपाय करूनही सुंदर आणि चमकदार त्वचा मिळू शकतो. विशेष म्हणजे हे घरगुती फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असतात. (Face pack of multani soil and apple cider vinegar is beneficial for the skin)
गुलाब पाकळ्या, मुलतानी माती आणि अॅपल सायडर व्हिनेगरचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असतो. मात्र, हा फेसपॅक करताना नेहमीच गुलाबाच्या पाकळ्या या ताज्या असाव्यात. हा फेसपॅक तयार करण्यासाठी साधारण मुठभर गुलाब पाकळ्या, दोन चमचे मुलतानी माती आणि दोन चमके अॅपल सायडर व्हिनेगर आपल्याला लागणार आहे. सर्वात अगोदर गुलाब पाकळ्यांची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये मुलतानी माती मिक्स करून हे एकजीव करा.
त्यानंतर शेवटी यामध्ये अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा. ही पेस्ट साधारण वीस मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा आपल्या त्वचेला लावला पाहिजे. यामुळे त्वचेचा सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. दोन गुलाब फुलांच्या पाकळ्या आणि दूध लागणार आहे. सर्वात अगोदर गुलाब पाकळ्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये तीन चमचे दूध मिक्स करा.
ही पेस्ट आपल्या सर्व चेहऱ्याला व्यवस्थित लावा आणि साधारण वीस मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा खास फेसपॅक आपण दररोज देखील लावू शकतो. यामुळे आपल्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. अॅपल साइडर व्हिनेगर टाळूचे पीएच पातळी राखण्यास मदत करते. जर आपण कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आपण तेलामध्ये अॅपल साइडर व्हिनेगर मिक्स करून लावू शकता.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Face pack of multani soil and apple cider vinegar is beneficial for the skin)