Skin Care Tips : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ‘या’ 5 टिप्स फाॅलो करा!

| Updated on: Oct 18, 2021 | 10:20 AM

तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जोपर्यंत आपण त्वचेची विशेष काळजी घेणार नाहीत. तोपर्यंत आपली त्वचा सुंदर होत नाही. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दरवेळी बाजारातून महागड्या क्रिम आणण्याची काही गरज नाहीतर आपण घरगुती उपाय करूनही सुंदर त्वचा मिळू शकतो.

Skin Care Tips : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी या 5 टिप्स फाॅलो करा!
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जोपर्यंत आपण त्वचेची विशेष काळजी घेणार नाहीत. तोपर्यंत आपली त्वचा सुंदर होत नाही. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दरवेळी बाजारातून महागड्या क्रिम आणण्याची काही गरज नाहीतर आपण घरगुती उपाय करूनही सुंदर त्वचा मिळू शकतो. यासाठी आपल्याला काही घरगुती साहित्याचा वापर करावा लागेल.

हळद

हळद आपल्या आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर आहे, तशीच हळद आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. आपण दररोज चेहऱ्याला हळद लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आपण हळदीमध्ये दूध, बेसन पीठ, मध, गुलाब पाणी मिक्स करूनही लावू शकतो.

दूध

दूध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी दूध फायदेशीर आहे. मात्र, त्वचेला दूध लावताना दूध हे नेहमी कच्चे असले पाहिजे. दूध चेहऱ्याला लावल्याने आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

केशर

केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे. स्वयंपाकघरातील केशरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, केशर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

बेसन

कडुलिंब, बेसन आणि दही फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला काही कडुलिंबाची पाने/पावडर, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा दही लागेल. एका भांड्यात दही घाला. त्यात बेसन घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला साधारण वीस मिनिटे ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा.

चंदन पावडर

एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध, अर्धा चमचा दही मिसळा. तिन्ही घटक व्यवस्थित मिसळा आणि फेसपॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. अप्लाय केल्यानंतर, ते 15 मिनिटे पुरपणे कोरडे होऊ द्या. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these 5 tips to get beautiful skin)