मुंबई : प्रत्येक मुलीला सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची इच्छा असते. चांगले दिसण्यासाठी जेवढे चांगले कपडे आवश्यक असतात. तेवढीच भूमिका चांगल्या मेकअपची असते. चेहऱ्यावरील सर्व डाग मेकअपद्वारे सहज लपवता येतात. पण अशा अनेक मुली आहेत ज्यांना मेकअप करण्याची आवड आहे, पण मेकअप योग्य प्रकारे कसा करावा हे माहिती नसते. मेकअप नेमका कसा करावा, याबद्दल आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.
प्राइमर
मेकअप नेहमी प्राइमरने सुरू झाला पाहिजे. सर्व महिला जास्त करून ते वगळतात. प्राइमर तुमच्या मेकअपचा आधार म्हणून काम करते. यामुळे नेहमीच प्राइमर वापर करा.
फाउंडेशन
प्राइमर लावल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर फाउंडेशन वापरावे किंवा आजकाल बीबी आणि सीसी क्रीम येऊ लागल्या आहेत. त्याही खूप चांगल्या आहेत. पण ते चांगले मिसळल्यानंतर त्वचेवर लावा. फाउंडेशन वापरताना त्वचेचा टोन लक्षात ठेवा. तसेच, ऑफिस मेकअपसाठी खूप जास्त फाउंडेशन वापरू नका.
कन्सीलर
जर तुम्हाला मुरुम, बारीक रेषा किंवा डार्क सर्कल लपवायची असतील तर कन्सीलर वापरा. पण नेहमी त्वचेचा टोन लक्षात घेऊन कन्सीलर वापरा. कन्सीलर नेहमी तुमच्या त्वचेच्या टोनपेक्षा एक टोन हलके असावे.
कॉम्पॅक्ट पावडर
फाउंडेशन आणि कन्सीलर नंतर, मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर आवश्यक आहे. ब्लशच्या मदतीने त्याचा वापर करा आणि फक्त हलका रंग वापरा.
आयलाइनर आणि मस्करा
या स्टेप्स केल्यानंतर आता तुम्ही डोळ्यांचा मेकअप करू शकता. डोळ्यांमध्ये जाड किंवा पातळ मस्करा लावा. याशिवाय लाइनर, मस्करा इत्यादी देखील वापरता येतात.
लिपस्टिक
शेवटी ओठांवर लिपस्टिक लावा. तुमच्या मेकअपचा लूक लिपस्टिकनंतरच येतो. लिपस्टिक नेहमी आउटफिटनुसार असावी. तुम्ही ऑफिसमध्ये हलकी लिपस्टिक लावू शकता.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Follow these 6 steps while applying makeup)