थंडीच्या दिवसातच नव्हे तर प्रत्येक वातावरणातच महिला या आपल्या त्वचेबाबत फारच काळजी करत असतात. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासोबत नेमकं वॅक्सिंग कसं करायचं, हाही प्रश्न अनेकांना सतावतो. वॅक्सिंग करत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करु नये (Do’s & Don’ts for Waxing), हा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्वचेवरील अनावश्यक केसांना हटवण्यासाठी वँक्सिंग केले जाते. वँक्सिंग केल्यावर त्वचा स्वच्छ आणि सुंदर (Clean & Beautiful) दिसते. पण वँक्सिंगसाठी महिला पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करतात. तुम्ही घरीही अगदी सहज वँक्सिंग करू शकता. घरी वँक्सिंग (Waxing At home) केल्याने वैयक्तिक स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेता येते. शिवाय हा पर्याय परवडण्याजोगा ठरतो. अर्थात वँक्सिंग करताना काळजी घ्यावी लागते. तुमच्या त्वचेला कोणतेही नुकसान पोचू नये म्हणून काही सोप्या स्टेप्स आम्ही शेअर करत आहोत. जेणेकरुन तुम्हाला घरच्या घरी वँक्सिंग करणे सहज शक्य होईल.
वँक्सिंग करताना ही काळजी
सर्वप्रथम वँक्सिंग करण्यासाठी त्वचेला तयार करा. म्हणजे हात- पाय स्वच्छ धुवा आणि टॉवेलने पुसून घ्या. वँक्सिंग करण्यापूर्वी कोणतेही मॉइश्चरायझर लावछ नका. उलट त्वचा कोरडी हवी. त्वचा कोरडी असेल तर वँक्सिंग करताना त्रास होत नाही. हात- पाय म्हणजे वँक्सिंग करायच्या जागेवर तुम्ही पावडर लावू शकता. पावडर त्वचा पूर्ण कोरडी करते. शक्यतो पावडर लावूनच वँक्सिंग करा.