मुंबई : पावसाळ्याच्या हंगामाला सुरूवात झालीयं. हवामान बदलले की त्वचा आणि केसांवरही (Hair) परिणाम होतो. पावसाळ्यात केस गळणे, डोक्याला खाज येणे यासारख्या समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. या ऋतूत आपल्या केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात केसांमध्ये अतिरिक्त तेल आणि आर्द्रता असते, त्यावर नियंत्रण (Control) न ठेवल्यास केसगळती सुरू होते. इतकेच नाहीतर ऋतूतील आर्द्रतेमध्ये टाळूही खराब होण्यास सुरूवात होते. केस गळण्यामागे कोंडा हे मुख्य कारण मानले जाते. आपल्या केसांमध्ये कोंडा होणार नाही, यासाठी काळजी घेणे महत्वाचे आहे. या हंगामात आपल्याला केसांची विशेष काळजी घ्यावी लागते नाही तर केस गळतीची (Hair loss) समस्या अधिक गंभीर होण्यास सुरूवात होते. केसांची काळजी घेण्यासाठी आपण काही घरगुती हेअर मास्क केसांसाठी वापरू शकता.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी दही हे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. दही केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. केसांना मुलायम बनवण्यासोबतच ते त्यांना पोषणही देते. दह्याद्वारे टाळूला खाज येणे, कोंडा, कोरडे केस यासारख्या समस्या तुम्ही दूर करू शकता. केसांना शॅम्पू करण्याच्या अर्धा तास अगोदर आपल्या केसांना दही लावा. या दह्यामध्ये आपण लिंबू ही मिक्स करू शकता. दही केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
केसांची निगा राखण्यातही अंडी सर्वोत्तम मानली जातात. केस मजबूत बनवण्यासोबतच ते केसांना नवीन चमक देखील देतात. हा हेअर मास्क बनवण्यासाठी 3 अंडी आणि 3 चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि पेस्ट तयार करा आणि सुमारे 20 मिनिटे केसांवर राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. तसेच आपण केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी एका अंड्यामध्ये तीन चमचे दही मिक्स करून घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. नंतर हा मास्क केसांना लावा. यामुळे केसांची समस्या दूर होण्यास मदत होईल.
केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी कोरफड देखील खूप जास्त फायदेशीर ठरते. पावसाळ्याच्या हंगामात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपण चार चमचे कोरफडचा गरमध्ये खोबरेल तेल मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांवर लावा. साधारण वीस मिनिटे हा मास्क केसांवर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपले केस धुवा. यामुळे केस गळती तर दूर होईलच, शिवाय कोंड्याचीही समस्या दूर होण्यास मदत होईल.