Beauty Tips : लिपस्टिक वापरत आहात? मग ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

| Updated on: Oct 26, 2021 | 10:37 AM

तुम्ही कितीही चांगला मेकअप केलात पण जोपर्यंत तुम्ही ओठांवर लिपस्टिक लावत नाहीत. तोपर्यंत तुमचा लूक छान दिसत नाही. याशिवाय जर तुम्हाला मेकअप करायला आवडत नसेल तर केवळ काजल आणि लिपस्टिक वापरून तुम्ही तुमचा लूक आकर्षक बनवू शकता.

Beauty Tips : लिपस्टिक वापरत आहात? मग या खास टिप्स फाॅलो करा!
ओठांची काळजी
Follow us on

मुंबई : तुम्ही कितीही चांगला मेकअप केलात पण जोपर्यंत तुम्ही ओठांवर लिपस्टिक लावत नाहीत. तोपर्यंत तुमचा लूक छान दिसत नाही. याशिवाय जर तुम्हाला मेकअप करायला आवडत नसेल तर केवळ काजल आणि लिपस्टिक वापरून तुम्ही तुमचा लूक आकर्षक बनवू शकता. लिपस्टिक ही मेकअप किटमध्ये अत्यंत महत्वाची आहे. सामान्यत: महिलांकडे अनेक शेड्सच्या लिपस्टिक असतात. बहुतेक महिला एक्स्पायरी डेट न पाहता ते सतत वापरत राहतात. मात्र, एक्स्पायरी झालेल्या लिपस्टिकच्या वापरामुळे ओठांवर इन्फेक्शन किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.

लिपस्टिकचे टेक्सचर महत्वाचे

लिपस्टिक वापरताना तुम्हाला वाटत असेल की त्यात ओलावा येऊ लागला आहे किंवा ती कोरडी होऊ लागली आहे. तर समजून घ्या की लिपस्टिक खराब झाली आहे. टेक्सचर बदलल्यानंतर लिपस्टिक वापरू नका. याचा तुमच्या ओठांवर वाईट परिणाम होतो.

लॉन्‍ग वियरिंग लिपस्टिक

सामान्यत: महिला त्या लिपस्टिकला प्राधान्य देतात. ज्या ओठांवर जास्त काळ टिकून राहतात. परंतु सौंदर्य तज्ज्ञांचे असे मत आहे की, अशा काही गोष्टी लॉन्‍ग वियरिंग केलेल्या लिपस्टिकमध्ये जोडल्या जातात. ज्यामुळे ती लवकर संपते. अशी लिपस्टिक नेहमी एक्स्पायरी डेट पाहूनच वापरावी.

वास बदलणे

प्रत्येक लिपस्टिकमध्ये एसेन्स ऑइल जोडले जाते. लिपस्टिक लावताना तुम्हाला तिचा सुगंध नक्कीच जाणवला असेल. पण जर तुम्हाला लिपस्टिकचा सुगंध बदलल्यासारखा वाटत असेल तर ती लिपस्टिक खराब झाली आहे, असे समजा.

गरम ठिकाणी लिपस्टिक ठेऊ नका

जर तुमची लिपस्टिक अशा ठिकाणी ठेवली असेल जिथे खूप उष्णता असेल तर तुम्ही ती नेहमी तपासूनच वापरावी. गरम ठिकाणी लिपस्टिक लवकर खराब होते. म्हणून, ते फ्रीज किंवा कोणत्याही थंड ठिकाणी ठेवा.

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Hair Care | गर्भावस्थेदरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा ‘या’ खास टिप्स…

(Follow these special tips when using lipstick)