Makeup Tips : सणासुदीच्या काळात मेकअप करताना ‘या’ टिप्स फॉलो करा!

| Updated on: Oct 12, 2021 | 11:33 AM

नवरात्रीच्या सणांना विशेष महत्त्व आहे. दांडियाचे खास प्रोग्राम आयोजित केले जात आहेत. तसेच दुर्गा पूजेचे भव्य कार्यक्रम देखील आहेत. नवरात्रीमध्ये महिला आणि मुली साड्या आणि लेहेंगा जास्त घालतात. साडी आणि लेहेंग्यावर महिला विविध दागिने घालतात. नवरात्रीमध्ये सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची प्रत्येक महिलेला इच्छा असते.

Makeup Tips : सणासुदीच्या काळात मेकअप करताना या टिप्स फॉलो करा!
मेकअप
Follow us on

मुंबई : नवरात्रीच्या सणांना विशेष महत्त्व आहे. दांडियाचे खास प्रोग्राम आयोजित केले जात आहेत. तसेच दुर्गा पूजेचे भव्य कार्यक्रम देखील आहेत. नवरात्रीमध्ये महिला आणि मुली साड्या आणि लेहेंगा जास्त घालतात. साडी आणि लेहेंग्यावर महिला विविध दागिने घालतात. नवरात्रीमध्ये सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची प्रत्येक महिलेला इच्छा असते. आम्ही तुमच्यासाठी काही मेकअप टिप्स आणल्या आहेत. ज्या तुम्ही फाॅलो करून स्टायलिश लूक मिळू शकता.

डोळ्याचा बोल्ड मेकअप

दुर्गापूजा आणि दांडियासाठी आपल्या डोळ्यांचा मेकअप बोल्ड करा. तुम्ही डोळ्यांच्या वर आयलाइनर लावा आणि खाली काजल लावा. डोळ्यांना बोल्ड लूक देण्यासाठी मस्करा लावा. तुम्हाला हवे असल्यास, डोळ्यांना स्मोकी लुक देण्यासाठी तुम्ही ब्लॅक मॅट पावडर वापरू शकता.

त्वचेवर ग्लो

त्वचेवर ग्लो आणण्यासाठी प्रथम CTM स्किन केअर रूटीन फाॅलो करा. दुर्गापूजेमध्ये घाम आणि ओलावा जास्त असतो. अशा स्थितीत हेवी बेस लावण्याची चूक करू नका. आपण त्वचेवर लिक्विड हायलाईटर फाउंडेशन वापरू शकता. चेहऱ्याच्या गालाची हाडे हायलाइट करा जेणेकरून चमक दिसून येईल.

जाड भुवया

भुवया तुमचा लुक वाढवण्यासाठी काम करतात. जर तुमच्या भुवया पातळ असतील तर तुम्ही मेकअप आणि भुवया पेन्सिल वापरून त्या जाड करू शकता. भुवयांना नैसर्गिक स्वरूप देण्यासाठी तुम्ही तपकिरी पावडर वापरू शकता.

वॉटरपूफ्र मेकअप

नेहमी वॉटरपूफ्र मेकअप लावा. विशेषतः आयलाइनर आणि मस्करा वॉटरपूफ्र असावा. तुमचा मेकअप सेट ठेवण्यासाठी पावडर लावा.

ब्लशर लावा

चेहऱ्याला नैसर्गिक लुक देण्यासाठी तुमच्या त्वचेच्या टोननुसार न्यूड कलर लावा. दुर्गा पूजेच्या विशेष प्रसंगी तुम्ही ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips to do makeup during the festive season)