Skin Care : हायपरपिग्मेंटेशनने त्रस्त असाल तर या खास टिप्स फॉलो करा!

| Updated on: Oct 05, 2021 | 11:29 AM

आपल्यापैकी बहुतेकजण त्वचेच्या समस्यमुळे त्रस्त आहे. विशेषतः चेहऱ्यावरील चट्टे आणि हायपरपिग्मेंटेशनची समस्या अधिक वाढते आहे. या समस्यांपासून मुक्त होणे खूप कठीण आहे. तज्ञांच्या मते, मेलेनिनचे उत्पादन वाढल्यामुळे हायपरपिग्मेंटेशनची समस्या उद्भवते.

Skin Care : हायपरपिग्मेंटेशनने त्रस्त असाल तर या खास टिप्स फॉलो करा!
त्वचेची काळजी
Follow us on

मुंबई : आपल्यापैकी बहुतेकजण त्वचेच्या समस्यमुळे त्रस्त आहे. विशेषतः चेहऱ्यावरील चट्टे आणि हायपरपिग्मेंटेशनची समस्या अधिक वाढते आहे. या समस्यांपासून मुक्त होणे खूप कठीण आहे. तज्ञांच्या मते, मेलेनिनचे उत्पादन वाढल्यामुळे हायपरपिग्मेंटेशनची समस्या उद्भवते. तसेच यामागे देखील हार्मोनलचे कारण असू शकते.

फ्लोरोसेंट लाईट टाळा

फ्लोरोसेंट लाइट हायपरपिग्मेंटेशन वाढवण्यासाठी काम करतो. टीव्ही, लॅपटॉप, फोन, घरातील फ्लोरोसेंट ब्लेब हायपरपिग्मेंटेशन वाढवण्याचे काम करते. त्यामुळे या गोष्टी शक्य तितक्या कमी वापरा.

सनस्क्रीनचा वापर

सनस्क्रीन तुम्हाला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत रोज सनस्क्रीन आणि सनब्लॉक लोशन लावा. उन्हात बाहेर जाण्याच्या अर्धा तास आधी सनस्क्रीन लावा. हे त्वचेला लालसरपणा आणि उन्हापासून रोखण्यास मदत करते.

नाईट क्रीम

त्वचेला हायपरपिग्मेंटेशनपासून वाचवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम लावा. लक्षात घ्या की क्रीममध्ये वापरलेल्या उत्पादनामध्ये नैसर्गिक उत्पादने वापरली गेली आहेत.

त्वचेचे डाग

बरेच लोक त्वचेच्या डागांपासून मुक्त होण्यासाठी सायट्रिक अॅसिड असलेल्या गोष्टी वापरतात. यामुळे त्वचेतील पीएस शिल्लक विस्कळीत होते, ज्यामुळे सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे संक्रमण होऊ शकते.

एक्सफोलिएट

त्वचेमध्ये जमा झालेली मृत त्वचा काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएट केले जाते. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर जास्त एक्सफोलिएट करण्याची गरज नाही. याशिवाय, जर तुमची कोरडी आणि तेलकट त्वचा असेल तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एक्सफोलिएट करणे पुरेसे आहे. जास्त एक्सफोलिएशनमुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

मॉइश्चरायईज

तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

नारळ तेल 

नारळ तेल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. हे आपल्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. हे अतिनील किरणांपासून आपली त्वचा संरक्षित करण्यास मदत करते. नारळ तेलाने त्वचेची संपूर्ण मालिश करा. जेणेकरून ते आपल्या त्वचेमध्ये खोलवर शोषू शकेल. नारळ तेलाने चेहऱ्याची मालिश केल्यानंतर दहा मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips to eliminate the problem of hyperpigmentation)