मुंबई : दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी आपण डेंटीस्टकडे जातो किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या पेस्टचा आधार घेतो. मात्र, यातील रसायनांनमुळे आपल्या दातांची हानी देखील होऊ शकते. अशावेळी दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील ट्राय करू शकता. आज आम्ही दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे दातांचा पिवळेपणा जाण्यास नक्की मदत होईल. (Follow these tips to get rid of yellow teeth)
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपल्याला कडू लिंबाचे पाने, हळद आणि दालचिनी लागणार आहे. सर्वात अगोदर या तिन्ही गोष्टी मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या दातांवर ब्रशच्या सह्याने लावा. त्यानंतर वीस मिनिटे दात घासा. त्यानंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. हा उपाय आपण आठ दिवसांमधून दोनदा केला तर आपल्या दातांचा पिवळेपणा दूर होण्यास नक्की मदत होईल.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात आणि लिंबाच्या सालामुळे आपले दात स्वच्छ होऊ शकतात. आपल्या दातांवर लिंबाची साल चोळा आणि नंतर स्वच्छ धुवा. तसेच लिंबाच्या सालीचे पावडर तयार करा आणि दातांवर लावा. यामुळे देखील दातांचा पिवळेपणा दूर होईल. बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा.
ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. यामुळे केवळ काही मिनिटांतच आपले दात मोत्यासारखे चमकदार होतील. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. हे घटक ब्लिचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. म्हणून केळी खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता, ती साल आपण आपल्या दातांवर घासू शकता. आठवड्यातून किमान 2 वेळा हा उपाय केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Follow these tips to get rid of yellow teeth)