Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला थंड आणि तजेलदार ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा!

| Updated on: Apr 16, 2022 | 8:24 AM

उन्हाळ्याचा (Summer) हंगाम म्हटंले की, जळजळ, चिडचिड आणि तेलकट त्वचेची समस्या आलीच. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना या समस्या अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा टॅनही (Tan) ​​होते. अशा परिस्थितीत उन्हाच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय (Home Remedies) करून पाहू शकता.

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला थंड आणि तजेलदार ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा!
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याचा (Summer) हंगाम म्हटंले की, जळजळ, चिडचिड आणि तेलकट त्वचेची समस्या आलीच. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना या समस्या अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा टॅनही (Tan) ​​होते. अशा परिस्थितीत उन्हाच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय (Home Remedies) करून पाहू शकता. आपण नैसर्गिक घटक वापरू शकता. यामध्ये गुलाबपाणी, ग्रीन टी, काकडीचा रस, मुलतानी माती आणि कलिंगड इत्यादींचा समावेश आहे. यामुळे सनबर्नच्या समस्येपासून आराम मिळेल. हे घरगुती उपाय नेमके कसे करायचे याबद्दल आपण सविस्तरपणे आज जाणून घेणार आहोत.

इथे जाणून घ्या उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी उपाय

  1. ग्रीन टी आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर असते.ग्रीन टीमध्ये कोरफड मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावा. हे काही काळ चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर मसाज करून थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील पिंपल्स आणि टॅनची समस्या दूर होण्यास मदत होते.
  2. नारळाच्या पाण्यात गुलाब पाणी मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा. आपण त्यात तेल घालू शकता. तुम्ही याचा वापर फेशियल मिस्टमध्ये करू शकता. हे त्वचेवरील टॅन काढण्याचे काम करते. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे आपण कधीही वापरू शकतो.
  3. उन्हाळ्यात तुम्ही त्वचेसाठी बर्फाचे तुकडे वापरू शकता. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. बर्फाच्या ट्रेमध्ये काकडीचा रस टाकून तुम्ही बर्फाचे तुकडे बनवू शकता आणि त्वचेसाठी वापरू शकता. ग्रीन टी वापरून तुम्ही बर्फाचे तुकडे देखील बनवू शकता. डोळ्यांखालील काळ्या वर्तुळाची समस्या दूर करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.
  4. त्वचेला टोन सुधारण्यासाठी काकडीच्या रसामध्ये समान प्रमाणात गुलाब पाणी मिसळा. 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा. या खास उपायामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हा उपाय आपण दोन दिवसातून किमान एकदा करायला हवाच.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips : ‘या’ विशिष्ट तेलाचा वापर करा, होईल उन्हाच्या झळांपासून त्वचेचं संरक्षण!

Health Tips : हलासन करा, मणक्याच्या आणि पाठीच्या दुखण्यापासून कायमचा आराम मिळवा!