मुंबई : सनस्क्रीनचा वापर त्वचा उत्तम ठेवण्यासाठी आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. आजच्या काळात सनस्क्रीन त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही घराबाहेर जा किंवा नका जाऊ मात्र, आपल्या त्वचेला सनस्क्रीन लावा. जर त्वचेला सनस्क्रीन लावली नाहीतर टॅनिंग, असमान त्वचा टोन, फिकट त्वचा आणि काळे डाग यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीराच्या कोणत्या भागावर सनस्क्रीन लावली पाहीजे.
ओठ
आपण सर्वजण चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतो, पण ते ओठांवर लावत नाहीत. परंतु तुम्हाला विशेषतः ओठांना सूर्यापासून संरक्षण देणे आवश्यक आहे. त्वचेपेक्षा ओठ अधिक नाजूक असतात आणि ते लवकर खराब होतात. ओठांवर सनस्क्रीन लावण्यासाठी एसपीएफ युक्त लिप बाम वापरा.
कान
आपण अनेकदा शरीराच्या उघड्या भागावर सनस्क्रीन लावतो, पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की कान उघड्या भागात येतात. त्यावर आपण सहसा सनस्क्रीन लावत नाही. मात्र, कानालाही उन्हापासून संरक्षणाची गरज असते. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही चेहऱ्यावर सनस्क्रीन लावाल तेव्हा ते कानालाही लावायला विसरू नका.
पापणी
तुम्ही तुमच्या पापण्यांवर सनस्क्रीन क्वचितच लावली असेल. साधारणपणे लोकांना डोळ्यांना सनस्क्रीन लागण्याची भीती असते. प्रत्येकाला वाटते की यामुळे डोळ्यांना नुकसान होते आणि म्हणून ते पापण्यांवरही लावू नका. पापण्यांना देखील सनब्लॉकची आवश्यकता असताना, हे तुमच्या डोळ्यांना संरक्षण देते.
पाय
तुम्ही शॉर्ट्स वगैरे घालताना पायाला सनस्क्रीन लावले असेल, पण तुम्ही कधी पायांच्या वरती सनस्क्रीन लावता का? आपण अनेकदा सैल चप्प घालतो आणि त्यामुळे पायांच्या वरती सनस्क्रीन लावण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. अशा स्थितीत पायांनाही सनस्क्रीन लावा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..