चमकदार त्वचेसाठी ‘या’ तीन गोष्टींचा वापर कराच; परिणाम पाहून व्हाल चकीत!

| Updated on: Mar 15, 2022 | 5:53 PM

चमकदार त्वचेसाठी कृत्रिम प्रोडक्टवर वेळ व पैसा खर्च करण्यापेक्षा आपल्या घरातीलच असे काही पदार्थ आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची त्वचा नैसर्गिक पध्दतीने चमकदार करु शकतात. या लेखात अशाच तीन घटकांबद्दल माहिती देणार आहोत, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यांचे गुणधर्म त्वचेला आतून बरे करण्यात, ती हायड्रेट ठेवण्यासाठी आणि चमकदार बनवण्यासाठी प्रभावी आहेत.

चमकदार त्वचेसाठी ‘या’ तीन गोष्टींचा वापर कराच; परिणाम पाहून व्हाल चकीत!
उन्हाळ्यात मुरूमापासून सुटका करण्यासाठी 'या' टिप्स वापरा...
Image Credit source: Tv9
Follow us on

बदलती जीवनशैली (Lifestyle), वाढते प्रदूषण, कामाचा ताणतणाव आदी विविध घटकांचा परिणाम आपल्या त्वचेसह संपूर्ण आरोग्यावर जाणवत असतो. एकंदरीत याचा परिणाम म्हणून अकाली वृद्धत्व, चेहऱ्यावरील सुरकुत्या आदी समस्या निर्माण होत असतात. ज्यामुळे आपण वेळेआधीच म्हातारे वाटू लागतो. त्वचेची (skin) योग्य काळजी घेतल्यास तुम्ही स्वतःला या समस्यांपासून दूर ठेवू शकता. बाजारात त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक कृत्रिम उत्पादने असली तरी यातून अनेक दुष्परिणाम होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे घरगुती उपाय (home remedies) अधिक प्रभावी मानले जातात. दिवसाव्यतिरिक्त, रात्रीही त्वचेची काळजी घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या किचनमध्ये असलेल्या घटकांचा योग्य वापर करून आपण त्वचेची काळजी घेऊ शकता.

कच्चे दूध

कच्च्या दुधाला ‘ब्युटी रुटीन’चा भाग बनवल्यास ते त्वचेच्या समस्या दूर करू शकते. तसेच चेहऱ्याला चांगली चमक देण्यासाठीही कच्चे दूध उपयुक्त ठरत असते. दूध त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे सुरकुत्या, बारीक रेषा आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करते. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि खुणा दूर होतात. रात्री त्वचेची निगा राखण्‍याच्‍या रुटीनमध्‍ये याचा समावेश करायचा असेल तर यातून अनेक फायदे मिळू शकतात. एका कटोरीत चार ते पाच चमचे दूध घ्या. कापसाने या दुधाला चेहऱ्यावर लावा. दूध कोरडे झाले की झोपून जावे. सकाळ उठल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवावा. तुम्ही रोज अशा पद्धतीने दुधाचा चेहऱ्यांसाठी वापर करू शकतात.

बटाटा

त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा खूप प्रभावी मानला जातो. झोपण्यापूर्वी बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्याचे अनेक फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते, बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि डी असते आणि हे व्हिटॅमिन त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हा घटक वापरण्यासही खूप सोपा आहे. बटाट्याचा रस चेहऱ्यावर दररोज देखील लावता येतो. एक कप बटाट्याचा रस घेऊन चेहऱ्यावर लावा आणि झोपून जावे. सकाळी उठल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. जर तुम्ही असे 15 दिवस नियमित केले तर तुम्हाला चेहऱ्यावर खूप फरक दिसेल.

मध

त्वचा मऊ आणि ‘हायड्रेटेड’ ठेवण्यासाठी मध खूप प्रभावी मानले जाते. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी मध खूप फायदेशीर मानले जाते. इतर त्वचेचे प्रकार असलेले लोकदेखील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ते लावू शकतात. मधाचा पॅक बनवून रात्री झोपण्यापूर्वी ते चेहऱ्यावर लावा. यासाठी एक चमचा मध घेऊन त्यात बेसन आणि गुलाबपाणी मिसळा. एक तास पॅक ठेवल्यानंतर, साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हे त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करेल आणि ती निरोगी देखील ठेवेल

हेही वाचा:

गरोदर आहात, सिजर टाळायचे आहे? मग ‘या’ फळांचा आहारात समावेश नक्की करा!

‘हे’ आहेत देशातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय, येथे एकदा नक्की भेट द्या!