Skin Care : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी घरी तयार करा ‘हे’ फळांचे फेसपॅक !

| Updated on: Jun 18, 2021 | 12:03 PM

सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण होममेड फेस मास्क देखील वापरू शकता. दूध, मध, बेसन पीठ, हळद इत्यादींचे मिश्रण तयार करुन घरच्या घरी स्क्रब देखील तयार करता येते.

Skin Care : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी घरी तयार करा हे फळांचे फेसपॅक !
फेस पॅक
Follow us on

मुंबई : सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण होममेड फेस मास्क देखील वापरू शकता. दूध, मध, बेसन पीठ, हळद इत्यादींचे मिश्रण तयार करुन घरच्या घरी स्क्रब देखील तयार करता येते. विशेष म्हणजे आपण फळांच्य मदतीने फेसपॅक तयार करू शकतो. यामुळे आपली त्वचा सुधारण्यास देखील मदत होते आणि आपला पार्लरमध्ये जाण्याचा वेळ देखील वाचतो. (Fruit face pack is beneficial for getting beautiful skin)

फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पोषक समृद्ध असतात. याशिवाय फळे निरोगी त्वचेसाठीही वापरले जाऊ शकतात. पपईमध्ये पपाइन नावाचा घटक असतो जो त्वचेतून जादा तेल काढून टाकण्यास मदत करतो. हे चेहऱ्यावरील त्वचेला हायड्रेट करते. हे डी-टॅन पॅक म्हणून देखील कार्य करते. पपईचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी पपईचा लगदा, 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा कोरफडीचा रस आवश्यक असेल. हे सर्व साहित्य मॅश करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

कलिंगड आणि काकडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगड आणि काकडीचा रस लागणार आहे. ते दोन्ही रस व्यवस्थितपणे एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा. दूध आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करण्यासाठी कच्च्या दुधामध्ये 2 चमचे किसलेले कलिंगड मिक्स करा. 25 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. लिंबू आणि कलिंगडचा फेसपॅक करण्यासाठी लिंबाचा रस आणि कलिंगड मिक्स करून घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा हायड्रेट राहतो.

हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा. तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, हा खास फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल. केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Fruit face pack is beneficial for getting beautiful skin)