मुंबई : लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे जवळपास सर्वांनाच माहीती आहे. कारण कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण लसूणचा अनेक प्रकारे वापर केला. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, लसूण फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. लसूणचा वापर करून त्वचेवरील पुरळ, मुरूम, काळे डाग, टॅन आपण दूर करू शकतो. (Garlic is beneficial for the skin)
जर मुरुमाचा त्रास असेल तर लसूणचा रस वापरा. यासाठी 5 ते 6 चमचे लसूणचा रस घ्या आणि कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. थोडावेळ सुकू द्या. आता थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला आराम मिळेल. आपल्या चेहऱ्यावर पुरळ असेल तर आपण चारे ते पाच पाकळ्या लसूणच्या घ्या. त्याचा रस तयार करा आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते.
जर आपली त्वचा लूज पडत असेल तर आपण दररोज सकाळी उपाशी पोटी लसूण आणि मध खाल्ला पाहिजे. ज्यामुळे त्वचा लूज पडणार नाही. जर आपल्या त्वचेवर फोड असतील तर आपण चेहऱ्यावर लसूणची पेस्ट लावावी. ही पेस्ट तयार करण्यासाठी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या बारीक करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. मात्र, चेहऱ्यावर पेस्ट लावल्यानंतर त्रास होत असेल तर लगेचच पेस्ट धुवून टाका.
जर आपले केस गळत असतील आणि आपल्याला केसात कोंड्याची समस्या असेल तर आपण लसूण रस वापरू शकता. 2 चमचे लसूण रस घ्या, त्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब घाला आणि आपल्या केसांच्या मुळांवर लावा. हे केस गळणे आणि डोक्यातील कोंडापासून मुक्ती देईल. जर आपल्याला दमा असेल तर आपण लसूणचा रस वापरावा. यामुळे तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. याशिवाय तुम्ही लसूणही खाऊ शकता. दम्याच्या रूग्णांनी एक ग्लास पाण्यात लसूणचा रस मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health | वाढत्या वयासह शरीराला व्हिटामिनची गरज, अन्यथा गंभीर आजारांची शक्यता!https://t.co/1DN3A5Xg5M#vitamins #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2020
(Garlic is beneficial for the skin)