मुंबई : प्रत्येकालाच सुंदर आणि मजबूत केस हवे असतात. केस गळती ही भिती उतरत्या वयात प्रत्येकालाच असते. त्यात अलीकडे चूकीचा आहार, प्रदूषण या सर्वामुळे केसांची गळती ही एक मोठी समस्या झाली आहे. अशावेळी केसांच्या वाढीसाठी आणि केसांना मजबूत करण्यासाठी अनेक प्रकारची तेल वापरण्याचा सल्ला आपल्याला मिळत असतो. पण आपले केस आणि समस्या यांसाठी नेमकं कोणतं तेल वापरणं योग्य यासाठी काही महत्त्वाच्या तेलांचे फायदे आपण जाणून घेऊया…
केसांना सिल्की बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदाम तेल. बदाम तेल वापरताच तुमचे केस आधीपेक्षा अधिक सिल्की होतील. तसंच केसांमध्ये एक वेगळी चमक दिसून येईल.
केसांची वाढ वाढवण्यासाठी- बदाम तेल केस मजबूत करण्यासाठीही विशेष मदत करते. तसंच केसांची वाढ जलद करण्यासह दोन तोंडी केसांची समस्या कमी करण्यासाठीही बदाम तेल फार महत्त्वाचं ठरतं. बदाम तेलात विटामीन इ आणि नैसर्गिक अँटीऑक्सीडंट असतात जे केसांना मजबूत करण्यासह खराब होण्यापासून वाचवतात.
अनेक गुणांनी संपन्न तेल – केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही अर्गान तेल वापरू शकता. आर्गन ऑइलमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ई, स्क्लेलीन, ऑलेइक अॅसिड, लिनोलिक अॅसिड, पॉलीफेनॉल इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. हे केसांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. आर्गन तेलाचं हेअर कंडीशनरही फार उपयोगी असते. केसांचा गुंता सोडवून ते चमकदार करण्यासाठी हे कंडीशनर फार उपयोगी ठरते.
केस खराब होण्यापासून बचाव – केसांची निगा राखण्यासाठी काहीजण अनेक केमिकल वापरतात. केस रंगीत करतानाही केमिकल वापरले जाते. ज्यामुळे केस खराब होऊ शकतात. अशावेळी आर्गन तेल फार उपयोगी पडते. आर्गन ऑइलमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ई, स्क्लेलीन, ऑलेइक अॅसिड, लिनोलिक अॅसिड, पॉलीफेनॉल इत्यादी असल्याने या सर्वामुळे केस खराब होण्यापासून बचाव होतो आणि केस अधिक मजबूत होतात.
केसाच कोंढा होण्यापासून वाचवते- केसांच कोंढा होणे. ही अनेकांची समस्या असते. पण नारळ तेल ही सर्वात मोठी समस्या दूर करु शकते. सर्वाधिक वापरले जाणारे हे तेल अगदी केसांच्या मूळापर्यंत जाते. ज्यामुळे अनेक केसांच्या समस्या दूर होण्यासह केस गळणेही थांबते.
रंग केलेल्या केसांची काळजी- अनेकदा केसांना रंग दिल्यानंतर ते कोरडे वाटू लागतात. अशावेळी नारळ तेल फार उपयोगी पडते. केसांना नियमितपणे नारळ तेल लावल्याने केसांच्या अनेक समस्या होण्यापासून आपण वाचू शकतो.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
हे ही वाचा –
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
(hair care know benefits of almond coconut and argan oil for strong hairs)