Hair Care : कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!

| Updated on: Dec 01, 2021 | 9:22 AM

बदललेल्या जीवनशैलीचा फक्त आपल्या आरोग्यावरच नाहीतर केस आणि त्वचेवर देखील मोठा परिमाण झाला आहे. त्वचा आणि केस खराब होत आहेत. आजकाल बहुतेक लोकांना कोरडी त्वचा आणि केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

Hair Care : कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!
सुंदर केस
Follow us on

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीचा फक्त आपल्या आरोग्यावरच नाहीतर केस आणि त्वचेवर देखील मोठा परिणाम झाला आहे. त्वचा आणि केस खराब होत आहेत. आजकाल बहुतेक लोकांना कोरडी त्वचा आणि केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय प्रदूषण, थंडी, केसांना रंग लावणे, पोषणाचा अभाव, केसांची निगा न राखणे चुकीच्या सवयी यामुळे केसांवर गंभीर परिणाम होत आहेत आणि अगदी कमी वयामध्ये टक्कल पडणे किंवा केस पांढरे होणे या समस्या होत आहेत.

केसांच्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने आपल्या केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला एक कप कोरफड जेल, एक कप डिस्टिल्ड वॉटर, एक चमचा ग्लिसरीन, अर्धा चमचा व्हिटॅमिन ई तेल, लॅव्हेंडर तेलाचे 7-8 थेंब लागणार आहेत.

वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा. केस धुण्याच्या अगोदर साधारण वीस मिनिटे हे केसांना लावा. त्यानंतर आपले केस धुवा. या खास घरगुती उपायामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते. केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही केसांना अंडे देखील लावू शकता. शक्य असेल तर अंड्यामध्ये कोरफड जेल मिक्स करा.

एक पिकलेले एवोकॅडो मॅश करा. त्यात 2-3 चमचे नारळ तेल घाला. हेअर मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा. ही पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा. नंतर शॉवर कॅप घाला. 30-40 मिनिटे सोडा. त्यानंतर आपले केस सौम्य शैम्पू आणि कोमट पाण्याने धुवा. आपण हा मास्क आठवड्यातून 1-2 वेळा पुन्हा लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..